इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर महाराष्ट्र व देशाचे राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर सोशल मीडियावरून एक फोटो व्हायरल व्हायला लागला. अन्वय नाईक यांच्या मुलीने आणि पत्नीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (sharad pawar anvay naik) यांची भेट घेतल्यानंतर दोनच दिवसात अर्नबला अटक करण्यात आल्याचा दावा केला जाऊ लागला.
भाजप समर्थक अनेक सोशल मिडिया अकाउंट, पेजेस आणि ग्रुप्सवरून शरद पवार यांच्या सोबत अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा असलेला फोटो शेअर करत आहेत. ‘आत्महत्या केलेले इंटिरियर डिझायनर नाईक यांची पत्नी अचानक मीडिया समोर येऊन अर्णब विरोधात बोलत होती… अचानक हे कसे सूरु झाले याचे उत्तर म्हणजे हा २ दिवसांपूर्वी चा हा फोटो’ अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केला जातोय.
भाजपा अहमदनगर, भारतीय जनता पार्टी, ओन्ली मोदी सरकार, एक कोटी भाजप समर्थक यांसारख्या फेसबुक ग्रुप्सवर सदर फोटो शेअर होतोय.
ट्विटरवर सुद्धा फडणवीस प्रेमी महाराष्ट्र सेवक, बीजेपी तिवसा विधानसभा, हिंदू लाईव्हज मॅटर अशी नवे असणाऱ्या ट्विटर हँड्ल्सवरूनहे हाच फोटो त्याच दाव्यासह शेअर केलाय.
व्हॉट्सऍपवर देखील याच फोटोसह दावे व्हायरल होत आहेत. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी यांनी पडताळणीची विनंती केली आहे.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्च करून पाहिला असता आम्हाला केवळ याच पद्धतीचे दावे असणाऱ्या शेकडो पोस्ट दिसल्या. मूळ फोटो काही सापडत नव्हता. या शोधाशोधीत अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांचे फेसबुक अकाउंट सापडले परंतु यावरही फेसबुक फ्रेंड व्यतिरिक्त इतरांना त्या प्रोफाईल वॉलवरील सर्वच गोष्टी पाहण्याची मुभा नव्हती.
विविध कीवर्ड्सद्वारे सर्च केल्यानंतर ‘बोल भिडू‘ या मराठी पोर्टलची एक बातमी सापडली. बातमीनुसार व्हायरल फोटो खरा आहे. फोटोमध्ये शरद पवार (sharad pawar anvay naik) यांच्यासह अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक दिसताहेत. स्वतः आज्ञा नाईक यांनी तो फेसबुकवर अपलोड केल्याचे दिसते आहे. परंतु फोटो अपलोड करण्यात आल्याची तारीख काळजीपूर्वक बघितल्यास लक्षात येईल की हा फोटो आताचा नसून ५ मे २०१९ रोजीचा आहे.
या बातमीनुसार नाईक आई-मुलीने शरद पवार यांची दोन-तीन वेळा भेट घेतली असल्याचे दिसते आहे. परंतु या सर्व भेटी २०१९ सालातील आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अर्नब गोस्वामी यांच्या अटकेपूर्वी दोन दिवस आधी अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यासाठी जो फोटो व्हायरल केला जातोय तो सध्याचा नाही. फोटो वर्षभरापूर्वीचा असून अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा यांनीच आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केला होता.
हेही वाचा: हिंदू देव-देवतांची चित्रे असलेले गुप्तपणे बनलेले संविधान २०२४ मध्ये लागू होणार?
[…] हेही वाचा: अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी पवार… […]
[…] हे ही वाचा- अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी पवार… […]
[…] संबंध नव्हता. ती संपूर्ण बातमी ‘येथे‘ वाचू […]