Press "Enter" to skip to content

‘गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना व्हायरस १०० टक्के नष्ट होतो’ दाव्यात किती तथ्य?

कोरोना व्हायरस तयार करून चीनला विकला म्हणून बोस्टन विद्यापीठाच्या एका प्रोफेसरला FBI ने अटक केलीय असे लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्येच ‘गरम पाण्याची वाफ इनहेलेशन केल्यामुळे कोरोना विषाणूचे प्रमाण १०० टक्के नष्ट होते.’ असा दावा केलाय.

Advertisement

‘महत्वाची माहिती: शेवटी एफबीआयने बोस्टन विद्यापीठाच्या एका प्रोफेसरला अटक केली, जो वूहानमधील चीनी विद्यापीठ आणि संशोधन प्रयोगशाळेच्या संदर्भात होता आणि त्याला चीनने जबरदस्त पैसे दिले होते.

आता कोरोना व्हायरस हा बायो ऍटॅक नियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि तो चीनने आयोजित केला आहे. एका चीनी तज्ज्ञाने रहस्य सांगितले आहे की गरम पाण्यामधून वाफेचे इनहेलेशन केल्यामुळे कोरोना विषाणूचे प्रमाण १०० टक्के नष्ट होते. जरी व्हायरस नाक, घसा किंवा फुप्पुसात शिरला तरी, कोरोना व्हायरस गरम पाण्याच्या वाफेवर उभे राहू शकत नाही.

कृपया ही माहिती सर्वांना द्या.’

FBI arrested boston professor for selling corona virus to china whatsapp screenshot
Source: Whatsapp

ही अशी माहिती असलेली एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असल्याची माहिती ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण सागर यांनी ‘9172011480’ या ऑफिशियल व्हॉट्सऍप नंबरवर दिली.

पडताळणी:

व्हायरल पोस्टमध्ये दोन वेगवेगळे दावे आहेत.

‘चीनला कोरोना व्हायरस बनवून देण्याच्या आरोपाखाली FBI ची बोस्टन विद्यापीठाच्या फ्रोफेसरला अटक?’ या शीर्षकाखाली व्हायरल दाव्यातील पहिल्या भागाचे फॅक्टचेक ‘चेकपोस्ट मराठी’ने दुसऱ्या एका बातमीत केले आहे ते आपण ‘येथे’ वाचू शकता.

राहिला भाग दुसऱ्या दाव्याचा तर याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही ‘can water steam inhalation kill corona virus’ असे कीवर्ड्स वापरून गुगल सर्च केलं.

सर्च रिझल्टमध्ये आम्हाला आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सचे एक न्यूज आर्टिकल सापडले.

यामध्ये त्यांनी ‘लसूण, आले, लाल मिरची, चहापत्ती, निलगिरी कडुनिंब अथवा तेल यांपैकी काहीही टाकून किंवा तसेच गरम पाण्याची वाफ घेतल्यास श्वसनासंबंधी त्रासदायक ठरणारे विषाणू जसे की कोरोना, इंफ्ल्यूएन्झा, ह्रीनोव्हायरस वगैरे मरून जातात’ असे दावे असणाऱ्या पोस्टचा पडताळा केलेला आहे.

यात त्यांनी केलेल्या संशोधनानुसार ते असे सांगत आहेत की अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) किंवा जागतिक आरोग्य संघटना (WHO) या दोन्ही संस्था अशा कुठल्याही वाफेच्या उपचार पद्धतीला दुजोरा देत नाहीत. या अशा वाफेच्या इलाजाची कुठलीही वैज्ञानिक चाचणी झाली असल्याचे ऐकिवात नाही असे CDCने रॉयटर्सने म्हंटले आहे.

काही संशोधनांच्या आधारे रॉयटर्सने एवढेच सांगितले आहे की इतर महत्वाच्या औषधींच्या जोडीला वाफ घेतल्याने जास्तीत जास्त सर्दी तापासारख्या आजारांवर काहीसा फरक पडू शकतो पण सर्दी ताप पूर्णपणे बरे होण्यासाठी निव्वळ वाफ घेण्याचा मार्ग प्रभावी नाही असे शास्त्रीय अभ्यासातून समोर आलेले आहे.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना व्हायरस १०० टक्के नष्ट होत असण्याचा दावा निराधार असल्याचे स्पष्ट झाले. प्रमाणापेक्षा जास्त गरम पाण्याची वाफ घेतल्याने त्वचेला आणि अंतर्गत नाजूक अवयवांना सुद्धा ईजा पोहचू शकते.

हेही वाचा: गरम पाणी किंवा कडक ऊन कोरोना व्हायरस पासून वाचवू शकत असल्याचे दावे खोटे

More from कोरोनाMore posts in कोरोना »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा