Press "Enter" to skip to content

युक्रेनवर रशियन हल्ल्याचा म्हणून न्यूज चॅनेल्सनी चालवला जुना व्हिडीओ!

सध्या जगाचे लक्ष्य रशिया-युक्रेन युद्धाकडे (Russia Ukraine War) लागले आहे. रशियन सैन्याच्या युक्रेनवरील हल्ल्याने युद्धाची सुरुवात झाली आहे. रशियाकडून या हल्ल्याला सैन्य कारवाईचे नाव देण्यात आले आहे. भारतीय माध्यमांमध्ये रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा म्हणून एक व्हिडीओ चालविला जातोय.

Advertisement

‘टाईम्स नाऊ’च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. युक्रेनकडून लुहान्स्कमध्ये 5 रशियन विमाने, 1 हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा करण्यात आल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे.

अर्काइव्ह

‘झी न्यूज’, ‘न्यूज 24’, ‘रिपब्लिक वर्ल्ड’ने देखील हा व्हिडीओ चालवला. मात्र नंतर हा व्हिडीओ हटविण्यात आला.

Russia Ukrain war news indian media used old videos
Source: Youtube/ Twitter

आता मात्र हा व्हिडीओ साधारणतः दोन वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येतेय. युट्यूबवर 4 मे 2020 रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. 9 मे 1945 रोजी नाझी जर्मनीच्या आत्मसमर्पणाच्या स्मरणार्थ रशियामध्ये दरवर्षी 9 मे रोजी विजय दिवस साजरा केला जातो.

Source: Lessony

मॉस्को टाईम्सच्या बातमीनुसार 2020 मध्ये 4 मे रोजी विजय दिवसाची रिहर्सल आयोजित करण्यात आली झाली. या रिइहर्सलचे अनेक व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहेत. या व्हिडिओमधील जेट आणि व्हायरल व्हिडिओमधील जेट एकसारखेच आहेत.

Source: The Moscow Times

एकुणात भारतीय माध्यमांनी साधारणतः दोन वर्षांपूर्वीचा रशियाच्या विजय दिवसाच्या रिहर्सलमधील व्हिडीओ रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा म्हणून चालविल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा- हिजाब विवाद: पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या बुरखाधारी दहशतवाद्यांना रंगेहात पकडण्यात आले?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा