Press "Enter" to skip to content

‘इंडिया टीव्ही’ ने चायनीज म्हणून वापरला कोरियन सेलिब्रिटीचा फोटो.

हिंदी वृत्तवाहिनी ‘इंडिया टीव्ही’

Advertisement
ने जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणासाठी चीन कसा जबाबदार आहे आणि चायनीज लोकांच्या हलगर्जीपणमुळे जगाला कसे कोरोनाचा सामना करायला लागत आहे, हे दाखवणारा एक रिपोर्ट प्रसारित केला होता.

रिपोर्टसाठी वापरण्यात आलेले फोटो हे चीनमधील नाहीत, तर ते फोटोज कोरियामधील ‘चॅनयेओल’ नावाच्या व्यक्तीचे आहेत असा दावा करणारे अनेक ट्विट व्हायरल झाले होते. हे असे ट्विट करताना लोकांनी #ApologizeIndiaTV हा हॅशटॅग वापरला जो ट्विटरवर चांगलाच ट्रेंडीग होता.

‘आम्ही ‘चॅनयेओल’चे चाहते’ इंडिया टीव्ही’ कडून उत्तर मागत आहोत. या वाहिनीने अतिशय अपमानास्पद अशा कोविड-१९च्या संदर्भातील एका बातमीत ‘चॅनयेओल’चा फोटो वापरला आहे. ‘इंडिया टीव्ही’ ने विनाशर्मात माफी मागावी.’ अशा अर्थाचे अनेक ट्विट या ट्रेंडमध्ये बघायला मिळाले.

पडताळणी:

ह्या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या पडताळणीस सुरुवात केली. सर्वप्रथम आम्ही ‘इंडिया टीव्ही’ने वापरलेला फोटो गुगलच्या रिव्हर्स इमेज सर्च मध्ये टाकून बघितला.  आम्ही चॅनलने वापरलेल्या फोटोच्या पेजवर जाऊन पोहोचलो. या फोटोच्या खालीच ‘चॅनयेओल एक्सो’ असं लिहिलेलं आहे.

त्यानंतर साहजिकच आम्ही हा ‘चॅनयेओल’ नेमका आहे तरी कोण हे शोधायला सुरुवात केली. विकिपीडियानुसार ‘चॅनयेओल’ हा दक्षिण कोरियातील एक रॅपर आहे. तो गायक, लेखक आणि निर्माता सुद्धा आहे. त्याचं खरं नाव ‘पार्क चॅन-येओल’ असं असून त्याला ‘चॅनयेओल’ या नावानेच ओळखतात. सोशल मिडीयावर त्याचा तगडा जम आहे.

युट्युबवर ‘चॅनयेओल’ असा कीवर्ड टाकून सर्च केल्यास त्याच्यासंबंधीचे वेगवेगळे व्हिडीओज सुद्धा पहायला मिळतात.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट’च्या पडताळणी मध्ये हे सिद्ध झालं की ‘इंडिया टीव्ही’ने वापरलेला फोटो ‘चॅनयेओल’ या दक्षिण कोरियातील नावाजलेल्या रॅपरचा आहे.

‘चॅनयेओल’चा आणि चीनचा किंवा कोरोना विषाणूचा काहीही संबंध नाही. त्यामुळे ‘इंडिया टीव्ही’ने ‘दुनिया में हल्ला मचने लगा’ , ‘चीन का रोल दिखने लगा’ या मथळ्याखाली चालवलेली बातमी आणि ‘चॅनयेओल’चा फोटो ही विसंगती आहे हे सिद्ध झालं.

केवळ चीनी व्यक्तीच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता फोटो शोधून बातमीचा आणि चीनचा संबंध जोडण्याचा प्रयत्न ‘इंडिया टीव्ही’ कडून करण्यात आला. आमच्या पडताळणीमध्ये हा व्हायरल ट्रेंड सत्य निघाल्याने आम्ही त्यास ‘चेकपोस्ट’वर हिरवा झेंडा दाखवत आहोत.

हे ही वाचा- सुदर्शन न्यूज टीव्हीच्या संपादकांने कॉमेडी व्हिडीओचा तुकडा वापरून उडवली ‘मिया’ची खिल्ली !

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा