Press "Enter" to skip to content

पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार रात्री ११.३० ते सकाळी ६ पर्यंत व्हॉट्सऍप बंद? वाचा सत्य!

फेसबुक, व्हॉट्सऍप आणि इंस्टाग्राम हे फेसबुकच्या मालकीचे तिन्ही ऍप्स सोमवारी ४ ऑक्टोबर २०२१ रोजी तब्बल ६ तासांसाठी बंद होते. यानंतर सोशल मीडियात एक इंडिया टीव्हीच्या (India TV) बातमीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात सांगितले जातेय की पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार तुमचे व्हॉट्सऍप (What’s app) रात्री ११.३० ते सकाळी ६ पर्यंत बंद राहील. असे होऊ नये म्हणून तुम्हाला काही बाबी कराव्या लागतील अन्यथा ते बंद होईल आणि चालू करण्यासाठी दरमहा ४९९ रुपये भरावे लागतील.

Advertisement
अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुधीर सोनटक्के आणि प्रा. संतोष साखरीकर यांनी हे व्हिडीओज निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओ बारकाईने अभ्यासला असता असे लक्षात आले की यात दिलेली माहिती इतर कुठल्याही वृत्तपत्रात किंवा वृत्तवाहिनीवर नाही. तसेच हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ अर्धवट आहे. त्यामुळे आम्ही ‘इंडिया टीव्ही’चा मूळ व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला.

१७ सप्टेंबर २०१९ रोजी अपलोड झालेल्या या बातमीचा मूळ व्हिडीओ आम्हाला ‘इंडिया टीव्ही’च्या (India TV) अधिकृत युट्युब चॅनलवर आढळला. त्यांच्याही लक्षात जेव्हा हे आले की त्यांचा व्हिडीओ एडीट करून फेक दावे करण्यासाठी व्हायरल केला जातोय तेव्हा त्यांनी व्हिडीओचे कॅप्शन बदलले आहे आणि या अर्ध्यामुर्ध्या क्लिप पासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की ‘पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार तुमचे व्हॉट्सऍप (What’s app) रात्री ११.३० ते सकाळी ६ पर्यंत बंद राहील’ असे सांगणारे व्हायरल दावे फेक आहेत. ‘इंडिया टीव्ही’च्या (India TV) ‘व्हायरल दाव्याची पडताळणी’करणाऱ्या बातमीलाच एडीट करून खोटे दावे व्हायरल केले जात आहेत. यांवर विश्वास ठेऊ नका.

हेही वाचा: पितृ पक्षातील अमावस्येला प्रकट झालेली नदी दिवाळी अमावस्येला अदृश्य होते?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा