Press "Enter" to skip to content

राम-सीता असलेली इंग्रजांची नाणी फेक; अशी कुठली नाणी अस्तित्वातच नव्हती!

अयोध्यात ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला पण या सोहळ्याचे आणि श्रीरामाचे इतरत्र बादरायण संबध जोडणारे दावे काही थांबले नाहीत. असाच एक दावा म्हणजे ‘इस्ट इंडिया कंपनी’ने रामसीता असलेली नाणी चलनात आणली होती. (ram sita on british coin)

Advertisement

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अजीव पाटील यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली.

‘अजब योगायोग आहे. इंग्रजांनी सन १८१८मध्ये २ आण्याचे नाण काढल, त्यावर एका बाजूला होत रामपंचायतन व दुसऱ्या बाजूला कमळ आणि द्वीप, व जारी करायची तारीख होती ५ ऑगस्ट. आणि आपलीही तारीख आहे ५ ऑगस्ट !’

या अशा मेसेज सोबत एका नाण्याच्या दोन्ही बाजूंचे फोटोज व्हायरल होतायेत. फेसबुक युजर श्रीकांत परब यांनी शेअर केलेली पोस्ट:

ram on british coin virals

(ram sita on british coin) ट्विटरवर सुद्धा हेच दावे प्रचंड व्हायरल होतायेत.

ट्विटरवर व्हायरल झालेल्या पोस्ट पाहण्यासाठी ‘येथे’ क्लिक करू शकता.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करण्यासाठी व्हायरल होत असणाऱ्या नाण्यांचे फोटो गुगलवर रिव्हर्स सर्च करून पाहिले. परंतु हे फोटो कुठल्या अधिकृत वेबसाईट किंवा संस्थेच्या माहितीशी संलग्न असल्याचे आढळले नाही.

त्यामुळे आम्ही नाणी संग्राहक आणि अभ्यासक असणारे आशुतोष पाटील यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी दिलेली माहिती त्यांच्याच शब्दांत.

“या नाण्यांचा बारकाईने अभ्यास आणि निरीक्षण केल्यास लक्षात येते की हे नाणे पूर्णपणे बनावट आहेत. या प्रकारचे कुठलेही नाणे ईस्ट इंडिया कंपनी’ने पाडले नव्हते. हे नाणे अत्यंत ओबडधोबड बनवलेले असून फक्त फसवून नफा कमावण्याच्या हेतूने ही नाणी बनवण्यात आलेली आहेत. नाण्यावर अंकित कुठलेही शब्द इतिहासाशी आणि त्या काळाशी अजिबात साधर्म्य साधत नाहीत.

1) इंगजांच्या नाण्यावर नेहमी राजाचे /राणीचे नाव असायचे ज्याने ते नाणे पाडले.

2) कंपनीचे दोन आने मूल्याचे नाणे नेहमी चांदी धातूचे पाडले जात होते.

3) इंग्रजांच्या बाकी कुठल्याही नाण्यावर या प्रकारचे कमळ नाही.

4)UK अंकित असण्याचा काही संबंध नाही.

5)हे नाणे फार क्रूड पद्धतीने बनवलेले आहे. इंग्रजांची नाणी फार शार्प असतात.”

अधिक माहितीस्तव आशुतोष यांनी ईस्ट इंडिया कंपनीचे १८४१ मधील दोन आण्याचे नाणे कसे होते हे दाखवण्यासाठीही एक फोटो आम्हाला पाठवलाय.

(ram sita on british coin) ही अशी देवी देवतांची किंवा जुन्या धाटणीची नाणी आता नव्याने निर्माण करत ‘अँटीक’ म्हणून विकली जातात. अशी नाणी चोर बाजारापासून अँटीक शॉपमध्ये अव्वाच्या सव्वा किमती लाऊन विकली जातात. यांचा इतिहासाशी तिळमात्र संबंध नाही.

आशुतोष यांच्या माहितीव्यतिरीक्त आम्ही विविध कीवर्ड्स वापरून सर्च केले असता असे समजले की रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर विविध कालखंडातील नाण्यांचे फोटोज आहेत. तिथे जाऊन आम्ही तपास केला असता लक्षात आले की इंग्रजांच्या नाण्यांवर एका बाजूला राणी एलिझाबेथचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला त्या नाण्याचे मूल्य लिहिलेले असायचे.

RBI website coin info
Source: RBI

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दाव्यांसह फिरणारी नाणी फेक असल्याचे निष्पन्न झाले.

जी नाणी अस्तित्वातच नव्हती त्यांची जारी करण्याची तारीख कशी अस्तित्वात असेल? म्हणजेच त्या जारी करण्याच्या ५ तारखेचा आणि या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या ५ ऑगस्ट तारखेचा योगायोग वगैरे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

हेही वाचा:राम मंदिर निर्मितीच्या आनंदात स्पेन मध्ये ढोलताशे? फेक दावे व्हायरल!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

  1. Pratima Pratima August 11, 2020

    Good job👌👌👌👌

    • checkpostmarathi checkpostmarathi Post author | August 11, 2020

      Thank you, To get daily updates please follow ‘CheckPost Marathi’ on social media. If you want, you can get whatsapp updates from 9172011480.

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा