भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सरकार विरोधात आक्रमक होताना दिसताहेत. अशा वेळी ट्विटरवर काही फोटोज व्हायरल करण्यात येताहेत.
‘उषा जोशी कट्टर हिंदू’ या ट्विटर हँडलवरून एक फोटो अपलोड करण्यात आलाय. त्यात कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘पहचानने वालो को 100 तोपो की सलामी’
कॅप्शनमध्ये थेट सोनिया गांधींचा उल्लेख नसला, तरी फोटोवर करण्यात आलेल्या कॉमेंटवरून मात्र ही गोष्ट स्पष्ट होते की फोटोत दिसणारी व्यक्ती सोनिया गांधी आहे हे भासविण्याचा प्रयत्न केला जातोय. हा फोटो जवळपास १३०० ट्विटर युजर्सनी रिट्वीट केलाय.
सनी कुमार बायहट या फेसबुक अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेले फोटोज २१ हजार युजर्सनी शेअर केलेत.
विनय कुमार द्विवेदी या फेसबुक अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेली पोस्ट जवळपास ३१०० युजर्सनी शेअर केलीये.
पण ही काही फक्त सध्याचीच घटना नाही. भूतकाळात सुद्धा वेळेवेळी सोशल मीडियात असे फोटोज व्हायरल करण्यात आलेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने या फोटोजची सत्यता पडताळून पहिली. आमच्या संशोधनात आम्हाला सर्वप्रथम इंटरनॅशनल बिझनेस टाईम्सच्या बेन स्कीपर यांचं ७ मार्च २०१४ रोजी प्रकाशित फोटो फिचर सापडलं.
बेन स्कीपर यांच्या याच फोटो फिचरमध्ये आम्हाला सध्या सोशल मिडीयावर सोनिया गांधी यांच्या नावाने व्हायरल होत असलेला फोटो देखील आढळला. फिचरमध्ये या फोटोची सविस्तर माहिती मिळाली.
हा फोटो आहे १९६१ सालातला. जगप्रसिध्द बॉंड सिरीजमधील पहिला मुव्ही ‘Dr No’ च्या शुटींग वेळचा हा फोटो असून फोटोमध्ये चित्रपटातील अभिनेता सीन कॉनेरी आणि अभिनेत्री उर्सुला आंद्रेस दिसताहेत. फोटोमध्ये दिसणारी तिसरी व्यक्ती म्हणजे टेरेंस यंग होय.
त्यानंतर हाच फोटो आम्हाला IMDB वर देखील मिळाला. तिथे देण्यात आलेल्या माहितीनुसार देखील हा फोटो १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘Dr No’ चित्रपटातील असून फोटोत दिसणारे कलाकार सीन कॉनेरी, उर्सुला आंद्रेस आणि टेरेंस यंग हेच आहेत.
‘Dr No’ चित्रपटाच्या कव्हरवर पण उर्सुला आंद्रेस बघायला मिळतात.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालं आहे की सोशल मिडीयावर सोनिया गांधींचे म्हणून व्हायरल करण्यात येत असलेले फोटोज बॉंड सिरीजच्या पहिल्या चित्रपटातील अभिनेत्रीचे आहेत.
उर्सुला आंद्रेस या स्विस अभिनेत्री असून ‘Dr No’ चित्रपटातील हनी रायडरच्या भूमिकेसाठी त्या जगभर ओळखल्या जातात.
[…] हेही वाचा: जेम्स बॉंडमधील अभिनेत्रीचे फोटोज सोन… […]
[…] हे ही वाचा- जेम्स बॉंडमधील अभिनेत्रीचे फोटोज सोन… […]