Press "Enter" to skip to content

कृष्णाच्या पायाला स्पर्श होताच वाटीतील पाणी गळून कसे जाते? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

वासुदेव आणि बाळकृष्णाची मूर्ती असलेल्या पितळी वाटीमध्ये कृष्णाच्या पायापर्यंत पाणी भरले असता थेंबभरही पाणी सांडत नाही; परंतु जसा पाण्याचा स्पर्श कृष्णाच्या पायाला होतो तसे वाटीच्या खालच्या बाजूला असलेल्या बिळातून सर्व पाणी वाहून जाते. हे असे चमत्कारिक दृश्य (mystery of krishna’s siphon) असलेला व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय. काही जणांकडून हा दैवी चमत्कार असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

‘काय विचित्र कारागिरी आहे …
या 250 वर्षांच्या पितळी भांड्यात भगवान कृष्णाजी वासुदेवाजींच्या मांडीवर बसले आहेत.
हा वाडगा पाण्याने भरल्याने ते कोठूनही सांडत नाही परंतु जेव्हा पाणी भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या तळव्यांना स्पर्श करते तेव्हा सर्व पाणी तळाच्या छिद्रातून सांडते.’

अशा मजकुरासह १.२८ मिनिटाचा व्हिडीओ शेअर केला जातोय. हेच दावे हिंदी इंग्रजीतूनही व्हायरल होतायेत.

ट्विटर, फेसबुक, युट्युब आणि व्हॉट्सऍप अशा सर्वच माध्यमांतून हा व्हिडीओ व्हायरल होतोय. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील आणि बळीराम घोलप यांनी सदर व्हिडीओमागचे विज्ञान स्पष्ट करण्याची विनंती केली.

पडताळणी:

  • जर आपण त्या व्हायरल व्हिडीओसोबत असणारा ऑडीओ जर व्यवस्थित ऐकला तर आपल्या लक्षात येईल की त्यातही त्यांनी हा ‘दैवी चमत्कार’ असल्याचा दावा कुठे केला नाही. उलट ही कारागिराची आणि विज्ञानाची कमाल असल्याचे सांगितले आहे.
  • यामागचे नेमके विज्ञान काय असावे हे शोधण्यासाठी आम्ही विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता या संबंधी २०१८ सालचा एक व्हिडीओ आम्हाला सापडला.
  • या व्हिडीओत आपण पाहू शकता की त्या भांड्यातील कृष्णाची मूर्ती वासुदेवाच्या मूर्तीपासून सहज बाजूला होते. म्हणजेच ती मूर्ती चिकटवलेली नाही, त्या मूर्तीमागे छिद्र आहे.
  • याच व्हिडीओमध्ये साध्या प्लास्टिकच्या डब्याचा आणि स्ट्रॉचा वापर करून तो प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
  • या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये या तंत्रज्ञानास ‘सायफन’ असे संबोधले आहे. हे तंत्र नेमके काय आहे हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासंबंधी देखील एक व्हिडीओ आम्हाला मिळाला.
  • ‘बेल सायफन’ या तंत्रात पाणी जोपर्यंत त्या भांड्याच्या छिद्राला जोडलेल्या नळीच्या तोंडापर्यंत पोहचत नाही तोवर ते भांडे भरत जाते परंतु एकदा त्या छिद्रापर्यंत पाणी पोहचते तेव्हा त्यात तयार झालेली पोकळी पाण्याने भरली जाते आणि बाहेरचे पाणी आतल्या भागातून त्या नळीच्या सहाय्याने खाली गळून जाते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की पितळेची ती वाटी हा काही ‘दैवी चमत्कार’ (mystery of krishna’s siphon) वगैरे नसून ती कारागिराची कमाल आहे. ‘बेल सायफन’ ही हे वैज्ञानिक तंत्र वापरून बनवलेल्या कलाकुसरेचा तो उत्तम नमुना आहे. त्या जागी श्रीकृष्णाची मूर्ती असली किंवा नसली तरीही ते पाणी तशाच पद्धतीने खाली येईल.

हेही वाचा: गोकुळाष्टमीला खुद्द श्रीकृष्ण मथुरेच्या मंदिरातील भाविकांनी ठेवलेली दहीहंडी फोडतो? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा