सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (sonia gandhi) आणि सोबत एका विदेशी महिलेचा फोटो असून ती विदेशी महिला म्हणजे सोनिया गांधीच असल्याचा दावा युजर्सकडून करण्यात येतोय.
व्हायरल फोटो सोबत एक कॅप्शन देखील आहे. त्यावरचा दावा असा, ” जब वो 15 साल CM और 7 साल PM रहने के बावजूद तुम्हारे लिए चायवाला है..!! तो तुम्हें अपनी पुरानी पहचान से परेशानी क्यों है छम्मक छल्लो.”
फेसबुकवरून अनेक युजर्सकडून हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल फोटोतील महिला खरंच सोनिया गांधी (sonia gandhi) आहेत का? आणि जर ती महिला सोनिया गांधी नसेल तर, मग तो फोटो कुणाचा हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोध घेतला. आमच्या शोधात समजले की व्हायरल फोटोत दिसणारी महिला हॉलिवूड अभिनेत्री रिज विदरस्पून (reese witherspoon) आहे.
रिज विदरस्पून अमेरिकन अभिनेत्री आणि निर्मात्या आहेत. त्यांना ‘वाक द लाइन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्रीसाठीचा ऑस्कर देखील मिळालेला आहे. शिवाय त्या २ गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या देखील मानकरी ठरलेल्या आहेत.
टाईम मासिकाने २००६ आणि २०१५ साली त्यांचा जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला होता. फोर्ब्सने देखील २०१९ सालच्या जगातील सर्वात शक्तिशाली १०० महिलांच्या यादीत विदरस्पून यांना स्थान दिले होते.
सध्या व्हायरल होत असलेला फोटो त्यांच्या १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘फिअर’ या चित्रपटाच्या एका दृश्यातील आहे. या चित्रपटात रिज विदरस्पून यांनी निकोल वॉकर ही भूमिका निभावली होती. अलामीच्या वेबसाईटवर आपण हा फोटो बघू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल फोटोत दिसणारी महिला सोनिया गांधी नसून हॉलिवूड अभिनेत्री रिज विदरस्पून आहे.
हे ही वाचा- जेम्स बॉंडमधील अभिनेत्रीचे फोटोज सोनिया गांधींचे म्हणून व्हायरल !
Be First to Comment