Press "Enter" to skip to content

कॉंग्रेसने मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या फाईव स्टार होस्टेलमध्ये हिंदूंना प्रवेश नाही?

जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठात ‘फाईव स्टार’ हॉटेल सारख्या काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी बनलेल्या स्पेशल होस्टेलमध्ये केवळ मुस्लीम प्रवेश घेऊ शकतात (five star hostel for muslim). हिंदू आणि सिखांना परवानगी नाही. हे कॉंग्रेसच्या काळात २०१२ साली बनवलेलं होस्टेल आहे. असे काही दावे सोशल मीडियात व्हायरल होताहेत. काही लोक तोच होस्टेलचा फोटो जेएनयुच्या नावे सुद्धा खपवताहेत.

Advertisement

असेच दावे फेसबुकवर सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होताहेत.

Source: Facebook

हाच दावा ‘जेएनयु’ बाबत केला जातोय. व्हॉट्सऍपवर फॉरवर्ड होत असलेली पोस्ट ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी निदर्शनास आणून दिली आणि पडताळणी करण्याची विनंती केली.

Image may contain: text that says "團冰 This is not a five star hotel. This is hostel constructed by Congress government in 2012 for JNU students from J&K. It has 400 rooms. In this hostel no Hindus or other religion can stay. Islam students on JK will stay free of cost and study here on the cost our whole Indian tax payers money. After completing the course, they will shout slogans against Indian nation. What a secular party is Congress? 13:43"
Source: Whatsapp

पडताळणी:

व्हायरल दाव्यांची मुद्देसूद पडताळणी खालीलप्रमाणे:

१. हे होस्टेल ‘जेएनयु’चे आहे का?

व्हायरल दाव्यासोबत अस्रणाऱ्या इमारतीचा फोटो व्यवस्थित पाहिला तरी लक्षात येईल की त्यावर ‘ J&K Hostel Jamia Millia Islamia’ असे लिहिलेले आहे. म्हणजेच याचा ‘जेएनयु’शी काहीही संबंध नाही.

२. होस्टेल कॉंग्रेसच्या काळात झाले आहे का?

होस्टेल बनवण्यासाठी जामिया आणि गृहमंत्रालयात २०१२ साली MOU वर सह्या झाल्या होत्या. त्यावेळी कॉंग्रेस सरकार होते हे खरे आहे परंतु याचे बांधकाम भाजपच्या काळात पूर्ण झाले. होस्टेलचे उद्घाटन तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या हस्ते झाले होते. १३० रूम्स आणि ४०० बेड्सचे हे होस्टेल जम्मू काश्मीरच्या विद्यार्थिनींसाठी बनवले आहे. १७ नोव्हेंबर २०१७च्या ‘द हिंदू’च्या बातमीमध्ये याविषयी सविस्तर उल्लेख आहे.

३. टॅक्स देणाऱ्यांच्या जीवावर फुकटात या होस्टेलच्या सुविधा पुरवल्या जात आहेत?

‘जामिया मिलीया इस्लामिया’च्या २०१९-२० वर्षाच्या माहिती पत्रकात या ‘J&K hostel’ संबंधी सर्व माहिती उपलब्ध आहे. पान क्रमांक ३६ वर हॉस्टेलच्या शुल्काविषयी माहिती आहे. एका शैक्षणिक वर्षासाठी एका विद्यार्थिनीला जवळपास २९,७५० रुपये भरावे लागत आहेत.

J&K girls hostel fees structure
Source: JMI

४. येथे हिंदू, सिख यांसारख्या मुस्लिमेतर विद्यार्थ्यांना प्रवेश नाही?

त्याच माहितीपत्रकात या होस्टेलमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रतेचे नियम लिहिले आहेत. हे होस्टेल केवळ अधिकृत पूर्णवेळ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच असेल, कमीतकमी ४५ टक्के मार्क शेवटच्या परीक्षेत असणे आवश्यक आणि त्या विद्यार्थिनीचे पालक किंवा वैवाहिक जोडीदार दिल्लीमध्ये कार्यरत असतील रहिवासी असतील तर होस्टेल मिळणार नाही असे नियम आहेत. या व्यतिरिक्त कुठेही कोणत्याही धर्माविषयी उल्लेख नाही.

J&K girls hostel eligibility checkpost marathi

एवढेच नव्हे तर खात्री करून घेण्यासाठी २०१८-१९ या वर्षात सदर होस्टेलमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनीची नावे सुद्धा आम्ही तपासून पाहिली. बहुसंख्य विद्यार्थिनी मुस्लीम (five star hostel for muslim) आहेत कारण हे अल्पसंख्यांकांचे विद्यापीठ आहे परंतु यामध्ये मुस्लिमेतर धर्मांच्या विद्यार्थिनींचाही समावेश आहे हे आपणास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनीच्या आडनावावरून सहज पडताळू शकता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल पोस्टमधील दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. ते होस्टेल ‘जेएनयु’चे नसून जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाचे आहे.

होस्टेलची तरतूद २०१२ साली कॉंग्रेस काळात जरी झाली असली तरी बांधकाम भाजप सरकारच्या काळात झाले आणि तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तसेच या होस्टेलमध्ये सर्वधर्मियांना प्रवेश असून ते निःशुल्क नाही.

हेही वाचा: बटण हत्ती समोरचे दाबले तरी मत कमळाला जात होते? बिहार निवडणुकीत EVM घोटाळा?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा