Press "Enter" to skip to content

हिजाब विवाद: मुस्लिम जमावाच्या दगडफेकीत हिंदू विद्यार्थिनी जखमी झाल्याचे व्हायरल दावे फेक!

कर्नाटकातील एका कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्यास मनाई करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या वाद-विवादाला (Hijab Controversy) हिंसक वळण लागले आहे. अशा वेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये काही लोक एका मुलीला उचलून घेऊन जात असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय की हिजाब प्रदर्शनांच्या दरम्यान झालेल्या दगडफेकीत हिंदू मुलीला धक्काबुक्की करण्यात आली आणि ती जखमी झाली.

Advertisement

अर्काइव्ह

सुदर्शन न्यूजच्या ट्विटर हॅण्डलवरून देखील हा व्हिडीओ पोस्ट ट्विट करण्यात आलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

‘टाईम्स नाऊ’चे पत्रकार दीपक बोपण्णा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विटरवर हाच व्हिडीओ शेअर करत व्हिडिओसोबत केले जात असलेले दावे फेक असल्याचे सांगितले आहे. बोपण्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार घटना बागलकोटच्या रबकवी बनहट्टी येथील सरकारी कॉलेजमधील आहे. सदर मुलीला बरे वाटत नव्हते. ती अतिशय थकलेली होती आणि जवळजवळ बेशुद्ध झाली होती. त्यानंतर तिला कॉलेज कॅम्पसमधून बाहेर नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता ‘राजस्थान पत्रिका’ या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर या घटनेसंदर्भातील बातमी बघायला मिळाली. बनहट्टी येथील सरकारी कॉलेजमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली. दोन गटांमधील विद्यार्थ्यांच्या विरोध प्रदर्शनांदरम्यान अज्ञातांनी दगडफेक केली. भगवी शाल घालून आलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या गेटवर थांबवण्यात आले, असे या बातमीत सांगण्यात आले आहे.

बनहट्टी येथील सरकारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅम्पसमध्ये कुठलाही विद्यार्थी जखमी झालेला नाही. कॉलेज सकाळी 7.30 वाजता सुरू झाले आणि व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी उपाशीपोटी शाळेत आली होती. त्यामुळे ती कॅम्पसच्या मैदानावर बेशुद्ध पडली. त्याचवेळी उपस्थित शिक्षिकेने मुख्याध्यापकांना ती मुलगी भूक आणि पाण्याअभावी बेशुद्ध पडल्याची माहिती दिली.

मुलीवर दगडफेक झालेली नाही. कॉलेजच्या बाहेर दगडफेक होत असताना ती कॉलेजमध्येच होती. कॉलेजच्या बाहेरील तणावपूर्ण वातावरणामुळे ती बेशुद्ध पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले असल्याची माहिती बागलकोटच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मुस्लिम जमावाने केलेल्या दगडफेकीत हिंदू विद्यार्थिनी जखमी झाल्याचे व्हायरल दावे चुकीचे आहेत. कॉलेजच्या बाहेर दगडफेक होत असताना सदर विद्यार्थिनी कॉलेजमध्येच होती. कॉलेजबाहेरील तणावपूर्ण वातावरणामुळे ती बेशुद्ध पडली होती, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- व्हायरल फोटोज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमोर ‘अल्लाहू अकबर’चे नारे दिलेल्या मुलीचे नाहीत! व्हायरल दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा