Press "Enter" to skip to content

एकादशीचे उपवास केल्याने कॅन्सरचा धोका टळत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा? वाचा सत्य!

तासुक होन्जो (Tasuku Honjo) आणि जेम्स एलिसन (James Ellison) या दोन शास्त्रज्ञांनी एकादशीचे उपवास केल्यास कॅन्सर होणार नाही असा शोध लावलाय. त्यांच्या या शोधास नोबेल पुरस्कार मिळाला असल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

Advertisement

व्हायरल दावा:

“एकादशी का व्रत” रखोगे तो कैंन्सर कभी नहीं होगा । अगर कोई व्यक्ति साल भर में कम से कम 20 दिन 10 घण्टे बिना खाये-पिये रहता है, उसे कैंसर होने की संभावना 90% कम होती है।
क्योंकि जब शरीर भूखा होता है तो शरीर उन सेल्स को नष्ट करने लगता है जिनसे कैंसर होता है। इस सोच को इस वर्ष “चिकित्सा का नोबल पुरस्कार” मिला है।
“सनातन धर्म” की वैज्ञानिकता का जवाब नहीं ।’

अशा मजकुरासह दोन्ही शास्त्रज्ञांचे फोटोज असलेले ग्राफिक्स व्हायरल होतेय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक जगदीश काबरे यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करत असताना विविध कीवर्डसच्या आधारे शोधाशोध केली असता असे लक्षात आले की हे दावे २०१८ सालापासूनच व्हायरल होत आहेत. त्यानंतर आम्ही तासुक होन्जो आणि जेम्स एलिसन या शास्त्रज्ञांविषयी शोधाशोध केली तेव्हा स्वतः नोबेल पारितोषिकांच्या अधिकृत वेबसाईटवर याविषयी माहिती मिळाली.

तासुक होन्जो आणि जेम्स एलिसन हे दोघेही शास्त्रज्ञ आहेत हे खरे आहे. त्यांना २०१८ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हे सुद्धा खरे आहे. परंतु त्यांना एकादशीच्या उपवासाने कॅन्सरवर मात करू शकतो या शोधास नव्हे तर मानसोपचार आणि आरोग्यविज्ञान विषयाचे नोबेल मिळाले आहे.

रेडीएशन्स, कीमोथेरपी या बाह्य उपचारांपेक्षा शरीरातील प्रतिकारशक्तीच सुदृढ करण्यावर भर द्यायला हवा. ट्युमर सेल्स आपल्या बाजूने लढणाऱ्या टी सेल्सला ‘चेकपॉंइट’ तयार करतात. ज्यामुळे त्यांचा धोका टळतो आणि कॅन्सर वाढत जातो. याच ‘चेकपॉंइट’ला नेस्तनाबूत करणारे औषध तासुक होन्जो आणि जेम्स एलिसन यांनी शोधून काढले आहे. ज्यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकार करणारे टी सेल्स प्रभावीपणे कुठल्याही अडथळ्याविना लढू शकतील. याच शोधास त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की तासुक होन्जो आणि जेम्स एलिसन या दोन शास्त्रज्ञांनी एकदाशीचे उपवास केल्यास कॅन्सरचा धोका टळू शकतो असे दावे कधीही केले नाहीत. व्हायरल ग्राफिक्समधील दावे फेक आहेत. त्या दोन्ही शास्त्रज्ञांना २०१८ साली मिळालेला नोबेल हा वेगळ्या शोधासाठी होता, एकदशीच्या उपवासाचे फायदे सांगण्यासाठी नव्हे.

हेही वाचा: नोबेल विजेते डॉ. होन्जो यांनी कोरोना व्हायरस मानवनिर्मितच असल्याचा दावा केलाय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा