Press "Enter" to skip to content

करौलीमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर लोकांनी घेतली काँग्रेसला मतदान न करण्याची शपथ?

राजस्थानमधील करौली येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या बाईक रॅलीवर झालेल्या दगडफेकीनंतर निर्माण झालेल्या दंगलीत हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 6 पोलिसांसह 22 जण जखमी झाले होते. तसेच अनेक दुकानांची जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती.

Advertisement

आता करौली हिंसाचाराच्या (Karauli Violence) संदर्भाने एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओच्या आधारे करौलीमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर राजस्थानमधील लोकांनी काँग्रेसला मतदान न करण्याची शपथ घेतली असल्याचे सांगितले जातेय. व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक लोकांचा समूह राजस्थान काँग्रेसला मतदान न करण्याची प्रतिज्ञा करताना दिसतोय. हा समूह घरोघरी जाऊन लोकांना देखील असे करण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची देखील शपथ घेतोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही गुगलवर किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता दैनिक भास्करच्या वेबसाईटवर साधारणतः वर्षभरापूर्वी प्रकाशित बातमी मिळाली.

mob took oath not to give vote to congress
Source: Dainik Bhaskar

बातमीनुसार ‘राजस्थान बेरोजगार एकीकृत महासंघ’ या संघटनेकडून राजस्थानमधील रामलीला मैदानावर प्रदेशाध्यक्ष उपेन यादव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली होती. बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी ही निदर्शने केली गेली होती. याच दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाला मतदान न करण्याची शपथ घेण्यात आली.

दरम्यान, पडताळणी दरम्यान आम्हाला युट्यूबवर याच संघटनेकडून साधारणतः पाच वर्षांपूर्वी अशाच प्रकारे राजस्थानमधील तत्कालीन भाजप सरकार विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाचा व्हिडीओ देखील बघायला मिळाला. यावेळी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना म्हणजेच भाजपला मतदान न करण्याची शपथ घेण्यात आली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी दरम्यान स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओचा करौली येथील हिंसाचाराच्या घटनेशी काहीही संबंध नाही. व्हिडीओ साधारणतः वर्षभरापूर्वीचा आहे.

बेरोजगारांच्या संघटनेकडून आपल्या विविध मागण्यांसाठी राजस्थान सरकार विरोधात निदर्शने केली होती. याच निदर्शना दरम्यान वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मतदान न करण्याची शपथ घेण्यात आली होती. याच संघटनेकडून भाजप सरकार सत्तेत असताना करण्यात आलेल्या आंदोलनांमध्ये भाजपला मतदान न करण्याची शपथ देखील घेण्यात आली होती.

हेही वाचा- मशिदीवर भगवा फडकवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ राजस्थानमधील नाही! मग कुठला? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा