Press "Enter" to skip to content

केरळमधील मुस्लिमांनी तलवारीने आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे का?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एका मूर्तीची तोडफोड केली जात असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय केरळमधील मुस्लिमांकडून तलवारीने वार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली जात आहे.

Advertisement

फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ ६१४ युजर्सकडून शेअर केला गेलाय. ‘जय भीम’च्या घोषणा देणारे आता कुठे आहेत आणि शांत का आहेत असा सवाल देखील उपस्थित केला जातोय.

Source: Facebook

ट्विटरवर देखील हा व्हिडीओ कॉपीपेस्ट दाव्यांसह शेअर केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

  • व्हिडिओमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली जात असल्याचे (ambedkar statue vandalised) स्पष्ट दिसते आहे. पण व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या.
  • आम्हाला Voice of Ambedkarite Movement या फेसबुक पेजवरून २६ ऑगस्ट २०१९ रोजी टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये व्हायरल व्हिडिओतील दृश्यांशी मिळतेजुळते फोटोज मिळाले.
  • फेसबुक पोस्टनुसार आंबेडकरांच्या पुतळ्याच्या तोडफोडीची घटना तामिळनाडूतील नागपट्टीनम जिल्ह्यातील वेदारण्यम येथील आहे. हिंदू समूहांनी पुतळ्याची तोडफोड केल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
  • मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही गुगलवर किवर्डसच्या आधारे शोध घेतला. आम्हाला ‘फ्री प्रेस जर्नल’च्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेल्या बातमीमध्ये हा व्हिडीओ बघायला मिळाला. २५ ऑगस्ट रोजी वेदारण्यममध्ये ही घटना घडली असल्याचे या बातमीमध्ये सांगण्यात आले आहे.
  • आम्हाला ‘आज तक’च्या युट्यूब चॅनेलवर यासंदर्भातील बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार दलित आणि दुसऱ्या समूहातील वादाने उग्र रूप धारण केल्यानंतर ४०० पोलिसांना तैनात करावे लागले.
  • इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी २८ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय ब्रॉंझचा नवीन पुतळा बसविण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीच्या तोडफोडीच्या घटनेशी (ambedkar statue vandalised) केरळ किंवा मुस्लिम समुदायाचा काहीही संबंध नाही. घटना साधारणतः दोन वर्षांपूर्वीची असून तामिळनाडूमधील नागपट्टीनम जिल्ह्यातील वेदारण्यम येथील आहे.

हेही वाचा- विलासराव देशमुखांच्या बालपणीचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून व्हायरल!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा