सोशल मीडियात एका लेटरहेडचा फोटो व्हायरल होतोय. भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली प्रदेश मुख्यालय प्रमुखाने पत्रक जारी करून कार्यकर्त्यांना सूचना दिल्याचे त्यात दिसत आहे. यामध्ये शेतकरी आंदोलन (farmers protest) नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यकतेनुसार हिंसक मार्ग अवलंबवल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार नसल्याची हमी देण्यात आल्याचं दिसतंय.
‘राष्ट्रहित में किसान आंदोलन संबंधी आग्रह’ या विषयाअंतर्गत शेतकरी आंदोलन कसे देशद्रोही आहे हे पटवून देत त्यांच्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीला उधळून लावण्याचे आदेश दिले आहेत. पत्रकावर भाजप दिल्ली प्रदेश मुख्यालय प्रमुख राजेश भाटीया यांची स्वाक्षरी सुद्धा आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संजय वाघमारे यांनी हेच लेटर व्हॉट्सऍपवर देखील व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल पत्राच्या सत्यतेची शहानिशा करण्यासाठी ऍडव्हान्स कीवर्ड सर्च करून पाहिले असता या संबंधी ‘बूम लाइव्ह’चा रिपोर्ट आम्हाला सापडला.
यानुसार ‘बूम’ने दिल्ली भाजप युनिट हेड नवीन कुमार यांच्याशी संपर्क साधल्याचे समजले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश भाटीया आता नव्हे तर सात महिन्यांपूर्वी प्रदेश मुख्यालयाचे प्रमुख होते. त्यांनी स्वतः या ‘फेक’ पत्रकावर आपली खोटी स्वाक्षरी फोटोशॉप करून टाकण्यात आली असल्याचे सांगत पोलीस तक्रार दाखल केली आहे.
तक्रार अर्ज:
सदर व्हायरल पत्रक खोटे असून त्यावरील स्वाक्षरी नकली असल्याचे सांगत जनतेला व कार्यकर्त्यांना अशा भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन करणारे पत्रक नवीन कुमार यांनी जारी केले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल पत्रक आणि त्यावरील स्वाक्षरी फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याविषयी अधिकृत कायदेशीर तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा: भाजप आमदाराने ऑन ड्युटी पोलिस अधिकाऱ्यास हॉटेलमध्ये केली मारहाण? व्हायरल व्हिडीओ सत्य?
[…] हे ही वाचा- भाजप कार्यकर्त्यांना शेतकरी आंदोलन र… […]