Press "Enter" to skip to content

‘झी न्यूज’ने दिली आलियाच्या पोटी सुशांत सिंग राजपूतच्या पुनर्जन्माची बातमी?

सोशल मीडियावर कथितरित्या ‘झी न्यूज’च्या बातमीचे म्हणून एक ग्राफिक व्हायरल होतेय. या ग्राफिकमध्ये “आलिया भट्टच्या मुलाच्या रूपात सुशांतचा ‘पुनर्जन्म'” असे लिहिलेले असल्याचे बघायला मिळतेय. या ग्राफिकच्या आधारे सोशल मीडियावर ‘झी न्यूज’ला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हे ग्राफिक मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

पडताळणी:

‘झी न्यूज’ने खरंच अशा प्रकारची बातमी दिली आहे का हे तपासण्यासाठी संबंधित किवर्डसच्या आधारे शोध घेतला. आम्हाला ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वेबसाईटवर 22 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली. या बातमीमध्ये सुशांत सिंग राजपूतच्या पुनर्जन्माचे भाकीत करणाऱ्या झी न्यूजला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. ‘झी न्यूज’ने ‘आसनसोल में सुशांत का पुनर्जन्म’ या हेडलाईनसह बातमी दिल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते.

source: Free Press Journal

आम्हाला ‘झी न्यूज’च्याच अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 21 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आलेले ट्विट देखील बघायला मिळाले. या ट्विटवरून ‘झी न्यूज’ने आसनसोल येथे सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) पुनर्जन्माची बातमी दिल्याची पुष्टी झाली.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ग्राफिक ‘झी न्यूज’च्या याच बातमीला एडिट करून बनविण्यात आले आहे. मूळ ग्राफिकमधील आसनसोल हा शब्द काढून टाकण्यात आला असून त्याऐवजी ‘आलिया भट के बच्चे के रूप’ हे एडिटिंगच्या सहाय्याने जोडण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ‘झी न्यूज’ने आलिया भटच्या पोटी सुशांत सिंग राजपूतचा पुनर्जन्म होणार असल्याची बातमी दिलेली नाही. सोशल मीडियावरील ग्राफिक एडिटेड आहे. ‘झी न्यूज’ने साधारणतः दोन वर्षांपूर्वी सुशांत सिंग राजपूतच्या पुनर्जन्माची बातमी दिली होती. याच बातमीचे ग्राफिक एडिट करून त्याआधारे ‘झी न्यूज’ला ट्रोल केले जात आहे.

हेही वाचा- ‘वास्को-द-गामा’ने भारत शोधला नाही, त्यास कान्हाभाई नावाच्या व्यापाऱ्याने भारतात आणलं? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा