Press "Enter" to skip to content

राष्ट्रपतीपदाची शपथ घेताच यशवंत सिन्हा देणार नुपूर शर्माच्या अटकेचे आदेश? वाचा सत्य!

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सत्ताधारी भाजपकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे, तर यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) हे या निवडणुकीतील विरोधकांचे उमेदवार असणार आहेत.

Advertisement

सोशल मीडियावर सध्या कथितरित्या यशवंत सिन्हा यांच्या वक्तव्याचा म्हणून एक स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेताच नुपूर शर्माच्या अटकेचा आदेश काढणार असल्याचा दावा या स्क्रिनशॉटच्या आधारे केला जातोय.

पडताळणी:

व्हायरल स्क्रिनशॉटमधील वक्तव्याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला मात्र सिन्हा यांनी अशाप्रकारचे विधान दिल्याची पुष्टी होऊ शकेल अशी एकही बातमी आम्हाला बघायला मिळाली नाही. यशवंत सिन्हा यांनी नुपूर शर्माचा (Nupur Sharma) निषेध केल्याच्या अनेक बातम्या मात्र बघायला मिळतात.

आम्ही यशवंत सिन्हा यांच्या ट्विटर अकाउंटवर देखील शोध घेतला. आम्हाला सिन्हा यांनी नुपूर शर्मा यांच्या संदर्भात पोस्ट केलेला एक व्हिडीओ बघायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ करतात मात्र नुपूर शर्माबद्दल त्यांनी मौन का धारण केले आहे, अशा प्रकारचा प्रश्न सिन्हा यांनी उपस्थित केलाय.

Alt News च्या मोहम्मद जुबेर (Mohammed Zubair) यांना देशात द्वेष पसरविण्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले आहे, मात्र देशात विष पसरवणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यावर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. पंतप्रधान यावरही काही बोलतील काय? असा सवाल यशवंत सिन्हा विचारताहेत. मात्र इथे सुद्धा यशवंत सिन्हा कुठेही आपण राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर नुपूर शर्माच्या अटकेचा आदेश देणार असल्याचे म्हंटलेले नाहीत.

व्हायरल स्क्रिनशॉटमधील दाव्यासंदर्भात ‘आज तक’ने यशवंत सिन्हा यांचे स्विय सहायक अक्षित सिंह यांच्याशी संपर्क साधला होता. यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर नुपूर शर्माच्या अटकेचे आदेश देणार असल्याचे वक्तव्य केलेले नाही. ही केवळ एक अफवा असल्याचे अक्षित सिंह यांनी सांगितले आहे.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठीच्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेताच नुपूर शर्माच्या अटकेचे आदेश देणार असल्याचे विधान केलेले नाही. व्हायरल दाव्यासोबतचा स्क्रीनशॉट फेक आहे.

हेही वाचा- भाजपच्या हैदराबादमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दारूचे वाटप? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा