Press "Enter" to skip to content

‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का?

‘व्हॉट्सऍप’ने आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीज (whatsapp new policy) जगासमोर आणल्यापासून सोशल मीडियात ‘सिग्नल’ नावाच्या मेसेंजर ऍपचा बोलबाला होऊ लागलाय. अनेकजण ‘व्हॉट्सऍप’ वरून ‘सिग्नल’च्या वापराकडे वळाले आहेत. अशात सोशल मीडियातून काही पोस्ट्स व्हायरल होतायेत ज्यात हे ऍप भारतीय असून उत्तर प्रदेशच्या गरीब घरातील युवकाने डेव्हलप केल्याचे दावे केले जाताहेत.

Advertisement

काय आहे व्हायरल दावा?

आयआयटीमधून सुवर्ण पदकासह उत्तीर्ण झालेल्या उत्तर प्रदेशातील छोट्या गावातील गरीब मुलाने सिग्नल नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपला नासा आणि युनेस्कोने २०२१ चे सर्वोत्कृष्ट नवीन अ‍ॅप म्हणून गौरविले आहे. हे ऍप तयार करण्यासाठी संस्कृत भाषेचा कोड वापरलाय.

हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपपेक्षा चांगले आहे आणि एका भारतीयाने ते अभिमानाने तयार केले आहे. सर्व भारतीयांना विनंती आहे की आत्मनिर्भर भारतला बढावा देणारे हे अ‍ॅप डाऊनलोड करुन घ्या आणि भारताला जगासमोर चमकवा.

तसेच व्हॉट्सअ‍ॅप सहा महिन्यांत बंद होईल कारण त्यांचे सर्व्हर भारतात पाठविलेल्या ‘गुड मॉर्निंग’ मेसेजेसची रहदारी हाताळू शकत नाहीत. आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना सुप्रभात संदेश पाठविणे सुरू ठेवण्यासाठी सिग्नल डाउनलोड करा. हा संदेश 10 लोकांना पाठवा आणि फ्लिपकार्टकडून रु. 500 चे व्हाउचर जिंकून घ्या.

A poor villager's son from Uttar Pradesh who passed from IIT with a gold medal has created an app called Signal.The App…

Posted by Vadya Sonawdekar on Sunday, 10 January 2021

अर्काइव्ह लिंक

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल पोस्टची पडताळणी करण्यासाठी एकेका दाव्याच्या खरेपणाची शहानिशा केली. व्हाट्सअँपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीज (whatsapp new policy) आल्यापासून असे अनेक दावे व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यामुळे त्यांची पडताळणी करणे महत्वपूर्ण ठरते.

१. उत्तर प्रदेशातील तरुणाने हे ऍप डेव्हलप केले आहे का?

आम्ही ‘सिग्नल’ ऍपच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन माहिती तपासली असता याच्या संस्थापकांत ‘Brian Acton, Moxie Marlinspike and Meredith Whittaker’ ही नावे दिसली. या नावांत किंवा डेव्हलपर्सच्या नावांत कुठेही भारतीय नाव आढळले नाही. सगळ्यात महत्वाचं असं की ‘सिग्नल’ बनवणाऱ्या Brian Acton यांनीच व्हाट्सअँप देखील बनवले होते. व्हाट्सअँप हे देखील Brian Acton यांचेच अपत्य आहे.

२. नासा आणि युनेस्कोने २०२१ चे सर्वोत्कृष्ट ऍप म्हणून पुरस्कृत केले आहे?

विविध ऍडव्हान्स कीवर्डच्या आधारे सर्च करूनही आम्हास ‘नासा’ आणि ‘युनेस्को‘ या दोन्ही संस्था कुठल्याशा ऍपला असे पुरस्कार देत असल्याचे आढळले नाही. जे पुरस्कारच अस्तित्वात नाहीत ते ‘सिग्नल’ला कसे मिळाले?

३. हे ऍप बनवण्यासाठी संस्कृत कोडचा वापर केलाय?

‘सिग्नल’च्या ऑफिशियल वेबसाईटवर सर्च केल्यानंतर हे ऍप बनवण्यासाठी वापरलेल्या कोड्सची लायब्ररी आढळली. यात Signal Protocol Java library, Signal Protocol C library, Signal Protocol JavaScript library चा समावेश आहे. यात कुठेही संस्कृतचा उल्लेख नाही.

४. ‘व्हॉट्सऍप’ सहा महिन्यांत बंद होणार आहे?

‘व्हॉट्सऍप’च्या अधिकृत वेबसाईट, सोशल मिडिया हँडल्स अशा सर्व ठिकाणी तपासले असता कुठेही हे ऍप सहा महिन्यांत बंद होणार असल्याचे लिहिलेले नाही. तसेच फेसबुक ही ‘व्हॉट्सऍप’ आणि ‘इंस्ताग्राम’ या दोन्हींची पॅरेंट कंपनीने सुद्धा असे कुठेच जाहीर केले नाही.

५. सदर व्हायरल पोस्टचा नेमका उद्देश काय?

प्रथमदर्शनी या पोस्टचा उद्देश ‘व्हॉट्सऍप’ सोडून लोकांनी ‘सिग्नल’चा वापर करावा असा दिसत असला तरीही यातील दावे, वापरलेल्या संज्ञा आणि ‘गुड मॉर्निंग’ मेसेजेसबद्दल लगावलेला टोला पाहता हा मेसेज उपहासात्मक असल्याचे जाणवते. आमच्या सर्च मध्ये अशा काही पोस्ट सापडल्या ज्यात त्यांनी टीप म्हणून लिहिले आहे की ही पोस्ट ‘Just For Humor’ म्हणजेच ‘विनोद निर्मिती’साठी आहे.

🌹🇮🇳🙏**A Proud Moment For All Indians** 🌹🇮🇳🙏*A poor villager's son from Uttar Pradesh who passed from IIT with a gold…

Posted by Pankaj Jain on Monday, 11 January 2021

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल पोस्ट्समधील दावे फेक आणि निराधार असल्याचे स्पष्ट झाले. मुळात ही पोस्ट कुणीतरी ‘उपहासात्मक’ पद्धतीने केवळ विनोद निर्मितीच्या उद्देशाने लिहिली असून ती सत्य मानून व्हायरल केली जात आहे.

हेही वाचा: जेटची कार्यक्षमता वाढावी म्हणून पाकिस्तानी पायलटने कॉकपिटमध्ये लघवी केली?

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा