Press "Enter" to skip to content

व्हॉट्सऍपने ISIS तुमच्या ‘डीपी’चा गैरवापर करत असल्याचा इशारा दिलाय?

दहशतवादी संघटना ISIS आपल्या ‘डीपी’चा गैरवापर करू शकते म्हणत व्हॉट्सऍपने सतर्कतेचा इशारा दिल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत.

‘जर कोणाच्या आई किंवा बहिणीने स्वतःचा photo whatsapp वर DP ठेवला असेल तर लगेच तो बदलायला सांगा कारण whatsapp वर ISIS चे hackers आहेत ज्यांच्याजवळ आपला whatsapp no आहे.

Advertisement
ते लोक आपल्या profile photo चा गैरवापर करून आपले अश्लील photo बनवतात..

Whatsapp च्या CEO नी request केली आहे की पुढचे 20-25 दिवस तरी स्वतःचा profile photo ठेवू नये. Whatsapp चे engineers आपल्या safety साठी नेहमी आपल्याला co-operate करतील.

हा msg लवकरात लवकर forward करा.. विशेषकरुन तरुण मुलींसाठी….’

असा सल्ला दिल्लीचे कमिशनर ए. के. मित्तल यांनी दिल्याचा मेसेज व्हॉट्सऍपवर जोरदार फिरत आहे. हा व्हायरल मेसेज ‘चेकपोस्ट मराठी’च्या वाचकांनी ‘9172011480’ या आमच्या अधिकृत नंबरवर पाठवून निदर्शनास आणून दिला.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी काही कीवर्ड्स वापरून गुगलवर सर्च केलं तर हा मेसेज केवळ मराठीतच नाही तर इंग्रजीमध्ये सुद्धा व्हायरल झाला असल्याचं लक्षात आलं.

Whatsapp Screenshot from New Indian Express news
Source: New Indian Express

हे असे मेसेज आताच नव्हेत तर २०१६ पासून व्हायरल होत असल्याच्या ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या २८ सप्टेंबर २०१६च्या एका बातमी मधून समजलं.

तरीही या फॉरवर्ड मेसेज मध्ये खरेच काही तथ्य आहे का? ISIS सारखी दहशतवादी संघटना हे असं काही करू शकते का? व्हॉट्सऍपच्या CEOनी असा काही सल्ला दिल्याचं दिल्लीचे पोलीस कमिशन ए.के. मित्तल म्हणाले आहेत का? हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला.

सर्वात आधी आम्ही व्हॉट्सऍपच्या CEOने असे काही आवाहन केल्याचं काही अधिकृत पत्र, मेसेज सापडतेय का यासाठी सर्च केलं पण व्हॉट्सऍपच्या अधिकृत वेबसाईटवर अशी काहीही माहिती मिळाली नाही.

त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पोलिस कमिशनर ए.के. मित्तल या नावाची शोधाशोध केली. परंतु त्यात आजवर होऊन गेलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत कुठेच हे मित्तल आडनावाचे अधिकारी सापडले नाहीत.

दिलेल्या क्रमांकावर कॉल लाऊन पाहिला पण ‘आउट ऑफ सर्व्हिस’ असल्याचं समजलं.

वस्तुस्थित:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये कुणी ए.के.मित्तल नाव असणारे दिल्लीत पोलीस कमिशन अस्तित्वातच नाहीत किंवा नव्हते हे समोर आलं. त्यांच्या नावाखाली दिलेला मोबाईल नंबर सुद्धा ‘आउट ऑफ सर्व्हिस’ असल्याचं निष्पन्न झालं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हॉट्सऍपच्या CEOने ISIS तुमच्या प्रोफाईल पिक्चर्सचा काही गैरवापर करेल म्हणून काळजी घ्या वगैरे सांगणारा सल्ला दिल्याचे कुठलेही अधिकृत पुरावे उपलब्ध नाहीत.

याचाच अर्थ तो मेसेज आणि त्यातील मजकूर फेक आहे.

तरीही आपणास आपल्या डीपी म्हणजे ‘डिस्प्ले पिक्चर’ किंवा ‘प्रोफाईल फोटो’ विषयी काही काळजी असेल तर आपल्या व्हॉट्सऍपच्या सेटिंगमध्ये ‘Account’ ऑप्शन वर क्लिक करून ‘Privacy’ मधील प्रोफाईल फोटोच्या सेटिंग्ज मध्ये जाऊ शकता आणि तिथे ‘My Contacts’ हा ऑप्शन निवडू शकता.

यामुळे आपला डीपी केवळ आपल्या फोनमध्ये सेव्ह असलेल्या नंबर्सच्या लोकांनाच दिसू शकेल इतर कुणीही तो पाहू किंवा डाऊनलोड करू शकणार नाही.

guidelines to secure whatsapp dp privacy
Whatsapp Screenshots

हेही वाचा: इंस्टाग्राम वर मुलींचे न्यूड फोटोज टाकून गँग रेप करणाऱ्या मुलांची एक्स्पोज लिस्ट फेक!

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा