Press "Enter" to skip to content

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे का?

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये कुणीतरी महंत नकवी यांना शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार-सन्मान करताना दिसताहेत. सोबतच मंत्रजाप देखील ऐकायला मिळतोय. व्हिडिओ शेअर करताना दावा केला जातोय की नकवी यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे.

Advertisement
Source: Facebook

ट्विटरवर देखील अशाच प्रकारचा दावा केला जातोय. सनातन धर्माचा स्वीकार ही नकवी यांची घरवापसी असल्याचं सांगण्यात येतंय.

अर्काइव्ह

पडताळणी:

सर्वप्रथम तर आम्ही ख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi) यांच्या धर्मांतरासंबंधीच्या बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला कुठल्याही विश्वासार्ह माध्यमामध्ये याविषयीची बातमी बघायला मिळाली नाही. त्यानंतर आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या असता नकवी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून २१ सप्टेंबर २०२१ रोजी शेअर करण्यात आलेले फोटोज बघायला मिळाले.

नकवी यांच्या पोस्टच्या कॅप्शननुसार नकवी यांनी नवी दिल्लीतील अंत्योदय भवनात शारदापीठाच्या श्री श्री श्री स्वात्मानेंद्र महाराजांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. तसेच नकवी यांना 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान आयोजित श्री शारदा स्वरूप राजश्यामला सरन्नवरात्री महोत्सवाचे निमंत्रण मिळाल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. या फोटोजच्या कॅप्शनमध्ये कुठेही धर्मांतरनाचा उल्लेख नाही.

नकवी यांच्याच अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला या भेटीचा व्हिडीओ देखील आम्हाला बघायला मिळाला. याच व्हिडिओतील छोटीशी क्लिप सध्या नकवी यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केल्याच्या दाव्यासह व्हायरल होतेय.

नकवी यांचे मुख्य सचिव कमलेश कुमार यांनी देखील धर्मांतरणाचा दावा फेटाळून लावला आहे. नकवी यांनी धर्मांतर केलेले नसून व्हायरल दावा पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे कमलेश कुमार यांनी सांगितले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी धर्मांतर करून हिंदू धर्म स्वीकारलेला नाही. सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत.

हेही वाचा- एडिटेड व्हिडिओच्या आधारे कन्हैया कुमारने इस्लामचा स्वीकार केल्याचा दावा व्हायरल!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा