Press "Enter" to skip to content

व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ‘हिमालया’ कंपनीचे मालक नाहीत, ना ते मुस्लीम आहेत! वाचा सत्य!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती समोरच्या जमावाला उद्देश्यून भाषण करताना रिलायन्स (Reliance) आणि बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहे. सोशल मीडियावर दावा केला जातोय की व्हिडिओत दिसणारी मुस्लिम धर्मीय व्यक्ती हिमालय कंपनीचा मालक (Owner of Himalaya) आहे. व्हिडीओ शेअर करताना हिमालय कंपनीची उत्पादनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं जातंय.

Advertisement

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओतील व्यक्ती ‘जिओ’ सोडून इतर कुठल्याही कंपनीचे कार्ड वापरा, असं सांगतेय. शिवाय रामदेव बाबाचा पैसा आरएसएसच्या शस्त्र खरेदीसाठीच वापरला जात असल्याने पतंजलीची उत्पादनं देखील खरेदी करू नकात, असंही आवाहन भाषण देणाऱ्या व्यक्तीकडून करण्यात येतंय.

फेसबुक आणि ट्विटरवर “ये मुल्ला Himalaya कम्पनी का मालिक है, वक्त है इसके भाषण को सुनिए विचार कीजिए और सतर्क हो जाइए, आयुर्वेदिक मेडिसिन से ब्यूटि प्रॉडक्ट्स बनाता है Liv52 syrup se lekar himaliya neem 🌿 tulsi aur hand sensitiser tak सभी ग्रूप में डालिए और ख़रीदना बंद कीजिए. खुद व खुद घुटने पर आ जाएगा. इस मुल्ले में और झाकीर नाईक में क्या फ़रक हैं? कुछ नही.” अशा मेसेजसह हा व्हिडीओ शेअर केला जातोय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक रविंद्र खांबेकर, कल्याण केळकर, पुरुषोत्तम शर्मा आणि संजय राजवाडकर यांनी सदर व्हिडिओ आणि दावे व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओमध्ये ‘टाईम्स एक्स्प्रेस व्हॉइस ऑफ डेमोक्रसी’चा लोगो बघायला मिळतोय. त्याआधारे यूट्यूबवर किवर्ड सर्च केलं असता आम्हाला ‘टाईम्स एक्स्प्रेस’ या युट्यूब चॅनेलवरून २६ जानेवारी २०२० रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला.

“हिंदुस्तानी कहना बंद करो – भानु प्रताप सिंह! CAA पर मुसलमानों के बीच मचाया तहलका” अशा शीर्षकासह हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शननुसार व्हिडिओमध्ये भाषण देत असलेली व्यक्ती वकील भानू प्रताप सिंह आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर दिल्लीच्या मुस्तफाबाद येथे आंदोलनास बसलेल्या आंदोलकांना उद्देश्यून भानू प्रताप सिंह यांनी भाषण केले होते.

भानू प्रताप सिंह यांच्याविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता असे समजले की ते सर्वोच्च न्यायालयात वकील असून राष्ट्रीय जनहित संघर्ष पार्टीचे अध्यक्ष आहेत. सहाजिकच ते हिमालया कंपनीचे मालक (Owner of Himalaya) नाहीत. त्यांचा ‘हिमालया’ कंपनीशी काहीही संबंध नाही.

‘हिमालया’ कंपनीची स्थापना मोहम्मद मनल (Mohammad Manal) यांनी केली होती आणि त्यांचे १९८६ मध्येच निधन झालेले आहे. ‘हिमालया’च्या वेबसाईटवर देखील त्याचा उल्लेख आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारी व्यक्ती ‘हिमालया’ कंपनीची मालक नाही. व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती भानू प्रताप सिंह असून ते सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत.

हेही वाचा- ‘द पिगॅसस प्रोजेक्ट’- राहुल गांधी, प्रशांत किशोर यांच्यासह अनेक पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पाळत!  

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा