Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांना १ कोटींची मदत करणाऱ्या दिलजीत दोसांझची आयकर विभागाकडून चौकशी?

सोशल मीडियावर एक ग्राफिक मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. दावा केला जातोय की आयकर विभागाकडून केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या पंजाबी गायक दिलजीत दोसांझची चौकशी सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिल्याने सूड भावनेतून दिलजीत विरोधात ही कारवाई (diljit dosanjh it raid) केली जात असल्याचं देखील सांगण्यात येतंय.

अर्काइव्ह पोस्ट

कर्नाटक काँग्रेसचे नेते श्रीवत्स यांनी देखील असाच दावा केलाय. श्रीवत्स यांचं ट्विट साधारणतः १४०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या दिलजीतची चौकशी, मात्र देशाला लुटणाऱ्या अनिल अंबानी यांना मोकळं मैदान हेच मोदी सरकारचं धोरण राहिलं असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

अर्काइव्ह ट्विट

पडताळणी:

दिलजीत दोसांझ यांनी सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाच्या समर्थनाची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक शेतकऱ्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठीच्या गोष्टींच्या खरेदीसाठी १ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. त्याबद्दल त्यांचं प्रचंड कौतुक देखील झालं होतं. मुख्य प्रवाहातील बहुतेक माध्यमांनी ही बातमी दिली होती.

आयकर विभागाकडून जर दिलजीत दोसांझ यांची चौकशी सुरु करण्यात आली असती, तर ती देखील निश्चितपणे एक मोठी बातमी ठरली असती. मात्र आम्ही अशा पद्धतीची काही नोटीस दिलजीत यांना पाठविण्यात आली आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला असता मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये आम्हाला अशा प्रकारची कुठलीही बातमी आढळली नाही.

त्यानंतर आम्हाला खुद्द दिलजीत यांचंच एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये त्यांनी आयकर विभागाच्या छाप्याची (diljit dosanjh it raid) बातमी नाकारली आहे. ३ जानेवारी रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आयकर विभागाच्या वतीने देण्यात आलेलं टॅक्सपेयर सर्टिफिकेट शेअर करून आयकर विभागाच्या धाडीसंदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दिलजीत दोसांझ यांनी पंजाबी भाषेतून केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “हे बघून घ्या माझं प्लॅटिनम सर्टिफिकेट. या महान देशाच्या निर्मितीतील माझं योगदान. ट्विटरवर स्वतःच्या देशभक्तीच्या गप्पा मारून तुम्ही देशभक्त नाही बनत. त्यासाठी काम करायला लागतं.”

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझ यांची आयकर विभागाकडून चौकशी सुरु झाली असल्याच्या दाव्यांना कुठलाही आधार नाही. स्वतः दिलजीत यांनीच या दाव्यांचं खंडन केलं आहे.

हे ही वाचा- ‘दै. सकाळ’ने दिली मिम ट्विट्स खरे मानत ‘कंगना-दिलजित’ वादाची बातमी!

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा