Press "Enter" to skip to content

5G स्पेक्ट्रम लिलावात सरकारला 2.8 लाख कोटींचे नुकसान? वाचा सत्य!

सोशल मीडियावर ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राच्या ‘टाइम्स बिझनेस’ या पानाचे म्हणून एक कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या कटिंगच्या आधारे दावा केला जातोय की 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सरकारला 2.8 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. काँग्रेसशी संबंधित अनेक सोशल मीडिया हॅण्डल्सवरून हे कटिंग शेअर करण्यात आले आहे. हा भाजप सरकारचा 5जी घोटाळा असल्याचे सांगितले जातेय.

Advertisement

काँग्रेस प्रवक्त्या पंखुडी पाठक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून यासंदर्भातील ट्विट पोस्ट केले आहे.

अर्काइव्ह

उत्तर प्रदेश काँग्रेस, बिहार युथ काँग्रेस, मध्य प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देखील हे कटिंग ट्विट करण्यात आले आहे.

पडताळणी:

सोशल मीडियावरील व्हायरल कटिंग प्रथमदर्शनीच फेक असल्याचे लक्षात येतेय. याचे महत्वाचे कारण असे की हेडलाईनमधला आकडा आणि खाली सब-हेडिंगमधील शब्दांमधील मूल्य यात जमीन अस्मानीचा फरक बघायला मिळतोय. शब्दांमध्ये 2.8 लाख कोटी बघायला मिळताहेत, तर हेडींगमधल्या 28 या आकड्यासमोर चौदा शून्ये आहेत, ज्याचा अर्थ होतो 2800 लाख कोटी.

व्हायरल वृत्तपत्राच्या कटिंगमध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय संपादक पंकज डोवाल यांची बायलाइन बघायला मिळतेय. पंकज डोवाल यांनी 2 ऑगस्ट रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ‘टाइम्स बिझनेस’चे कटिंग ट्विट केले होते. त्यांनी ट्विट केलेले कटिंग व्हायरल कटिंगशी साधर्म्य असणारे आहे, मात्र कटिंगमधील बातमी मात्र अगदी वेगळी आहे. या कटिंगमध्ये 5G स्पेक्ट्रमच्या लिलावातून सरकारला विक्रमी 1.5 लाख कोटींची कमाई झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आम्ही 2 ऑगस्ट 2022 रोजीच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मधील 5G स्पेक्ट्रमच्या लिलावासंदर्भातील बातमी आणि व्हायरल कटिंगची तुलना केली असता व्हायरल कटिंग एडिटेड असल्याचे स्पष्ट झाले. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सरकारला 2.8 लाख कोटींचे नुकसान झाल्याची कुठलीही बातमी आम्हाला बघायला मिळाली नाही.

‘अल्ट न्यूज’कडून देखील व्हायरल कटिंग एडिटेड असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की 5G स्पेक्ट्रम लिलावात सरकारला 2.8 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करण्यासाठी वापरले जात असलेले टाइम्स ऑफ इंडियाचे कटिंग एडिटेड आहे. टाइम्स ऑफ इंडियाने अशा प्रकारची कुठलीही बातमी छापलेली नाही. टाइम्सच्या मूळ बातमीमध्ये 5G स्पेक्ट्रम लिलावातून सरकारला 1.5 लाख कोटींची कमाई झाल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- पगार मागितला म्हणून भाजप आमदाराने कामगारास केली मारहाण? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा