Press "Enter" to skip to content

प्रसिद्ध कॉमेडियन टिकु तलसानिया यांनी इस्लामचा स्वीकार केलाय?

अभिनेता-कॉमेडियन टिकू तलसानिया (Tiku Talsania) यांचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताहेत. फोटोमध्ये त्यांनी मुस्लिम धर्मियांची टोपी घातलेली आहे आणि त्यांची दाढी देखील वाढलेली बघायला मिळतेय. फोटो शेअर करताना दावा केला जातोय की टिकू तलसानिया यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे.

Advertisement

अर्काइव्ह

एक व्हिडीओ देखील शेअर केला जातोय. व्हिडिओमध्ये टिकू पारंपरिक मुस्लिम पेहरावामध्ये आहेत. त्यात एक मुलगी त्यांना म्हणतेय,

“चचा, सलाम वालेकुम”.

प्रत्युत्तरात टिकू देखील “वालेकुम अस्सलाम” असे म्हणताहेत.

त्यानंतर ती मुलगी विचारते, “कैसे हैं आप?”

त्यावर टिकू “खैरियत” असे उत्तर देतात.

टिकू तलसानिया यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करून ते आता अब्दुल रहीम झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

पडताळणी:

व्हायरल दाव्यांच्या पडताळणीसाठी किवर्ड किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता युट्युबवर एक व्हिडीओ बघायला मिळाला. या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की तलसानिया यांनी इस्लामचा स्वीकार केलेला नसून व्हायरल व्हिडीओ त्यांच्या आगामी सीरिअलच्या शूटिंगच्या सेटवरचा आहे.

या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता ‘आज तक’ची बातमी बघायला मिळाली. टिकू तलसानिया यांनी ‘आज तक’शी बोलताना स्पष्ट केले आहे की व्हायरल दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटोज बीबीसीच्या एका शोच्या शूटिंगदरम्यान घेण्यात आली आहेत. या शोच्या एका एपिसोडमध्ये त्यांनी एक मुस्लिम भूमिका केली आहे. हा शो लवकरच यूट्यूबवर येणार आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अभिनेते आणि कॉमेडियन टिकु तलसानिया यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला असल्याचे व्हायरल दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटोज बीबीसीच्या एका शोच्या शूटिंग दरम्यानचे आहेत.

हेही वाचा- अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॉन फोर्डने इस्लाम धर्म स्वीकारल्याचे दावे फेक! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा