हरियाणामधील कर्नालच्या एका MBBS डॉक्टरचा कॅमेऱ्यासमोर गाईचे शेण खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच डॉक्टरला शेणामुळे इन्फेक्शन झाल्याचे सांगत हॉस्पिटलच्या आयसीयु रूममधील एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय.
‘करनाल का एमबीबीएस डॉक्टर जो दूसरों को गोबर खाने की सलाह देता था खुद गोबर खा खा कर पेट में इन्फेक्शन कर बैठा पहुंचा मेडिकल’ या कॅप्शनसह दावे व्हायरल होतायेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक जवाहरलाल साळुंखे यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने हे नेमके कोण डॉक्टर आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला असता हे कर्नाल येथील डॉ. मनोज मित्तल (Dr. Manoj Mittal) आहेत असे समजले. त्यांचा मागच्याच महिन्यात गाईचे शेण खातानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. खालील व्हिडीओमध्ये १.५६ मिनिटानंतर आपण त्यांना शेण खाताना पाहू शकता.
या डॉक्टरांना रुग्णालयात दाखल केले?
नाही, डॉक्टर ठणठणीत आहेत. त्यांनी नुकताच IBN24 नावाच्या वाहिनीला मुलाखत देखील दिली असल्याचे सांगितले. याची खातरजमा करण्यासाठी आम्ही शोधाशोध केली असता दोन दिवसांपूर्वीच म्हणजे १४ डिसेंबर २०२१ रोजी ‘IBN 24’ या युट्युब चॅनलवर त्यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ अपलोड केल्याचे आढळले.
तो दवाखाण्यातील फोटो कुणाचा?
आयसीयुमधील रुग्णाच्या फोटोची पडताळणी करण्यासाठी आम्ही रिव्हर्स इमेज सर्चची मदत घेतली असता ‘gofundme.com’ या वेबसाईटवरील फोटो आम्हाला मिळाला. फोटोज तंतोतंत जुळत आहेत. या फोटोतील व्यक्तीचे नाव बिधान थापा असे आहे. त्यांचा मृत्यू १० जुलै २०१७ रोजी झाला होता. ते अमेरिकेत होते, त्यांचे पार्थिव शरीर नेपाळला त्यांच्या गावी नेण्याइतके पैसे त्यांच्या पत्नीकडे नसल्याने त्यांनी क्राउड फंडींगच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यासाठी या वेबसाईटचा आधार घेतला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की शेण खाणाऱ्या डॉक्टरला शरीरभर पसरलेल्या इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे सांगणारे दावे फेक आहेत. त्यासाठी वापरण्यात आलेला रुग्णालयातील फोटो ४ वर्षे जुना आहे. व्हायरल दाव्यातील डॉक्टर मित्तल ठणठणीत आहेत.
हेही वाचा: चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा झाला स्फोट? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: गाईचे शेण खाणाऱ्या MBBS डॉक्टरला शरीरभर … […]