Press "Enter" to skip to content

कॉंग्रेसने वर्षानुवर्षे शालेय पुस्तकात टीपू सुलतानचा चुकीचा फोटो छापलाय? वाचा सत्य!

‘कॉंग्रेसने वर्षानुवर्षे शाळेच्या पुस्तकात टीपू सुलतानचा चुकीचा फोटो (Tipu Sultan photo) छापलाय. खरा फोटो पाहिला तर मुलं घाबरून गेली असती.’ अशा अर्थाच्या दाव्यासह सोशल मीडियात दोन फोटो असलेले ग्राफिक व्हायरल होत आहे.

Advertisement

‘सुल्तान की असली और नकली फ़ोटो में अंतर देखो, शायद नकली पुस्तको में इसलिए छपवाईं हो कि असली देखकर बच्चे डर ना जाए’ अशा कॅप्शन सह ‘नमो इंडिया’ या फेसबुक ग्रुपवर या दाव्याची पोस्ट आहे. दावा करणाऱ्याच्या पोस्टला बातमी करेपर्यंत ३५८ जणांनी शेअर केले आहे.

Source: Facebook

पडताळणी:

  • ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटोचे बारकाईने निरीक्षण केले असता टीपू सुलतानचा ‘रिअल फोटो’ म्हणून जो फोटो दर्शवला गेलाय त्यावर ‘Getty Image’ चा वॉटरमार्क असल्याचे आढळले.
  • स्टॉक इमेज क्षेत्रात कार्यरत असणारी गेट्टी इमेज ही एक ब्रिटीश वेबसाईट आहे. त्यावर हा फोटो नेमका कुणाचा हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी रिव्हर्स इमेज सर्चचा आधार घेतला.
  • गेट्टी इमेजवर आम्हाला त्या व्यक्तीचा फोटो सापडला. यावरील माहिती नुसार तो फोटो ‘टिप्पू टीप उर्फ टिब’ या व्यक्तीचा आहे. हा स्वाहीली-झानझाबरी गुलामांचा व्यापारी होता. बेल्जियन जिल्हा स्टॅन्ली फॉलचा तो गव्हर्नर देखील होता, अशी माहिती तेथे आहे.
  • या व्यक्तीचा कालखंड १८३७ ते १९०५ असा होता. सदर फोटो युनिव्हर्सल हिस्ट्री अर्काईव्ह मधून घेतला असल्याचे सांगितले आहे.
Source: Getty Image
  • टीपू सुलतानचा कालखंड १७५१ ते १७९९ असा आहे. फोटोतील व्यक्तीचा आणि टीपू सुलतानचा काहीएक संबंध नाही.
  • टीपू सुलतानचा कालखंड कॅमेऱ्याच्या शोधाच्या आधीचा असल्याने टीपू सुलतानचा एकही फोटो (Tipu Sultan photo) उपलब्ध नाही परंतु चित्रे उपलब्ध आहेत. ‘नोट्स ऑन इंडियन हिस्ट्री’ या वेबसाईटवर विविध चित्रकारांनी काढलेल्या टीपूच्या पेंटिंग्ज दर्शवल्या आहेत.
  • या पूर्वीही अशा प्रकारचे दावे व्हायरल झाले होते त्यावेळी देखील विविध ‘फॅक्टचेक’ पोर्टल्सने हे दावे फेक असल्याचे स्पष्ट करत फोटोतील व्यक्ती मोहम्मद बिन काल्फलन उर्फ रुमालीझा असल्याचे सांगितले होते. हा देखील १९ व्या शतकातला गुलामांचा व्यापारी होता.
  • भाजप प्रवक्त्या अश्विनी उपाध्याय यांनी ते दावा करणारे ट्विट केले होते.
BJP spokesperson tweets photo claiming to be that of
Source: Times of India

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की भाजप नेते आणि समर्थक टिपू सुलतानचा म्हणत जे फोटो व्हायरल करतायेत ते गुलामांचे व्यापारी आहेत. त्यांच्या कालखंडाचा आणि देशाचा टीपू सुलतानसोबत काहीएक संबंध नाही. त्यामुळे कॉंग्रेसने आपल्या पाठ्यपुस्तकांत छापलेला टीपूचा फोटो फेक आहे या दाव्यास काहीच आधार नाही. ते एक पेंटिंग आहे.

हेही वाचा: ‘भारतीय राजाने ‘रोल्स रॉईस’ कारची बनवलेली कचरागाडी’; कहानी अच्छी है मगर सच्ची नहीं!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा