Press "Enter" to skip to content

भाजप सरकारने सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाचं नाव बदलून ‘अदानी विमानतळ’ केलंय?

गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित छावडा यांनी ट्विटरवर दावा केलाय की भाजप सरकारने अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून (Sardar Patel Airport renamed) ‘अदानी विमानतळ’ केलंय.

ट्विटरवर एक फोटो पोस्ट करून छावडा लिहितात, “सरदार विरोधी, अदानी प्रेमी भाजपा. सरदार पटेल के नाम पे सिर्फ अपने राजकाज को चमकाने वाली भ्रष्ट भाजपा सरकार ने अपने उद्योगपति मित्र की खिदमत में गुजरात के अहमदाबाद एयरपोर्ट से देश के लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल का नाम गायब कर के अदानी एयरपोर्ट कर दिया। #बेशर्म_भाजपा”

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे राष्ट्रीय समन्वयक सरल पटेल यांनी देखील आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केलाय. त्यात पटेल यांनी थेट नाव बदलल्याचा (Sardar Patel Airport renamed) उल्लेख केला नसला, तरी त्यांचा रोख तिकडेच आहे. पटेल यांनी पोस्ट केलेला फोटो काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी देखील रिट्विट केलाय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

सोशल मीडियावर काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आलेल्या दाव्यांच्या पडताळणीसाठी आम्ही अहमदाबादच्या सरदार पटेल विमानतळाच्या नावात बदल करण्यात आल्याच्या बातमीचा शोध घेतला.परंतु आम्हला यासंदर्भात कुठलीही बातमी वाचायला मिळाली नाही.

पडताळणी दरम्यान आम्हाला ‘दै. लोकमत’च्या वेबसाईटवर दि. २३ ऑक्टोबर २०२० रोजी प्रकाशित बातमी वाचण्यात आली. या बातमीनुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मंगळुरु, लखनऊ आणि अहमदाबाद विमानतळ चालविण्यासाठी अदानी समूहाच्या ताब्यात देण्याचा करार झाला आहे. विमानतळ विकसित करून चालविण्यास देण्याकरिता खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यत आले होते. त्यात अदानी समूहाने बाजी मारली.

Source: Lokmat

मंगळुरु, लखनऊ आणि अहमदाबाद विमानतळ चालविण्यास देण्याकरिता केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने २१ ऑक्टोबर रोजी अदानी मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड, अदानी लखनऊ आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि अदानी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या तीन कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 6 नोव्हेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ चालविण्यासाठी अदानी समूहाकडे सुपूर्द केले. प्राधिकरणाने एका ट्वीटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली होती.

अदानी समूहाला पुढच्या ५० वर्षांसाठी विमानतळ चालविण्याचे कंत्राट मिळाले आहे. अदानी समूहाकडून मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाचे कंत्राट मिळविण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी १० ते १५ हजार कोटी रुपये मोजण्याची अदानी समूहाची तयारी आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून ‘अदानी विमानतळ’ करण्यात आल्याचा दावा चुकीचा आहे.

सरदार पटेल विमानतळाचं नाव बदलण्यात आलं नसून या विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारीचं कंत्राट पुढच्या ५० वर्षांसाठी अदानी समूहाकडे देण्यात आलं आहे.

हे ही वाचा- शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून अंबानींच्या नातवाला बघायला गेले पंतप्रधान मोदी?

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा