Press "Enter" to skip to content

समीर वानखेडे यांच्यावर ड्रग्ज माफियांकडून हल्ला करण्यात आला? वाचा सत्य!

सोशल मीडियावर दावा केला जातोय की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या टीमवर गोरेगावात ड्रग्ज पेडलर्सकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. मात्र माध्यमांनी छोटीसी बातमी देऊन मुख्य बातमीच चर्चतून गायब केली.

Advertisement

अर्काइव्ह

अशाच प्रकारचे दावे फेसबुकवर देखील व्हायरल होताहेत.

पडताळणी:

आर्यन खान प्रकरणात सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्यांच्यावर जर हल्ला झाला असता, तर त्याची निश्चितच मोठी बातमी झाली असती. किमान सध्याच्या परिस्थितीत तरी त्यांच्यावरील हल्ल्याची बातमी दाबली जाण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र याविषयीची कुठलीही बातमी आम्हाला मुख्य प्रवाहातील माध्यमामध्ये बघायला मिळाली नाही.

सोशल मीडियावर किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता एबीपी समूहाचे पत्रकार गणेश ठाकूर यांचं २३ नोव्हेंबर २०२० रोजीचं म्हणजेच साधारणतः वर्षभरापूर्वीचं ट्विट बघायला मिळालं. या ट्विटमध्ये त्यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीच्या टीमवरील हल्ल्याची माहिती दिली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता लोकसत्ताच्या वेबसाईटवर २३ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली. या बातमीमध्ये समीर वानखेडे आणि टीमवरील हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

Source: Loksatta

लोकसत्ताच्या बातमीनुसार समीर वानखेडे हे ड्रग्ज पेडलर कैरी मेंडिसला (Carry Mendes) पकडायला गेले त्यावेळी हा हल्ला झाला होता. एकूण पाच लोकांची टीम या कारवाईसाठी गेली होती. कैरी मेंडिसला पकडून एनसीबी ऑफिसला आणण्यात आलं होतं. या हल्ला प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली होती.

टीव्ही ९ मराठी, झी २४ तासने देखील या हल्ल्याची बातमी प्रसिद्ध केली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सद्यस्थितीत समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमवर कुठलाही हल्ला झालेला नाही. साधारणतः वर्षभरापूर्वी समीर वानखेडेंच्या नेतृत्वात ड्रग्ज पेडलर कैरी मेंडिसला पकडायला गेलेल्या एनसीबीच्या टीमवर हल्ला झाला होता. ती घटना सध्याची म्हणून व्हायरल होतेय.

हेही वाचा-  शाहरुखच्या वडिलांची ‘भारत छोडो’ आंदोलनातील भूमिका नाकारण्यासाठी केले जात असलेले दावे चुकीचे!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा