Press "Enter" to skip to content

रशियाने घर आणि गाडीवर भारतीय तिरंगा लावणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची ग्वाही दिलीय? वाचा सत्त्य!

रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine war) सुरु झाल्यानंतर अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. अनेक विद्यार्थ्यांना यशस्वीरीत्या भारतात परत देखील आणण्यात आले आहे.

Advertisement

सोशल मीडियावर एक ग्राफिक व्हायरल होतेय. दावा केला जातोय की युक्रेनमधील जे भारतीय घर आणि गाडीवर तिरंगा लावतील त्यांना रशियन सैन्याकडून कुठलाही धोका नाही. उलट रशियन सैन्याकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचवले जाईल. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु (Sergey Shoygu) यांनी हे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येतेय.

अर्काइव्ह

पडताळणी:

सोशल मीडियावरील व्हायरल ग्राफिकच्या पडताळणीसाठी आम्ही गुगलवर किवर्डसच्या साहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रशियाकडून अशा प्रकारची काही घोषणा करण्यात आल्याची कुठलीही बातमी आम्हाला बघायला मिळाली नाही. व्हायरल दाव्यांची पुष्टी होऊ शकली नाही.

दरम्यान, ‘एबीपी माझा’च्या वेबसाईटवर 25 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. या बातमीनुसार युक्रेनमधील भारतीय दूतावासाने युक्रेनमधील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार भारतीय नागरिकांनी प्रवास करण्यासाठी बाहेर पडताना गाडी किंवा बसवर भारताचा झेंडा लावावा अशा सूचना देण्यात आल्या आहे.

मार्गदर्शक सूचनांनुसार जे विद्यार्थी  सीमा भागाजवळ राहतात त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना बाहेर पडताना आपल्या कॉन्ट्रॅक्टरसोबत संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच सीमा भागाकडे येताना पासपोर्ट, कॅश (अमेरीकी डॉलर) आणि इतर गरजेच्या वस्तू सोबत ठेवण्यास देखील सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की रशियन सरकारकडून युक्रेनमध्ये घर आणि गाडीवर भारतीय तिरंगा लावणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची ग्वाही देण्यात आलेली नाही. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने मात्र भारतीयांना अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

हेही वाचा- प्रेमाचा संदेश देणारा व्हायरल फोटो अप्रतिमच, पण तो सध्याच्या युद्धजन्य युक्रेनमधला नाही!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा