Press "Enter" to skip to content

राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाचं पुढचं टार्गेट ‘मीडिया हाउसेस’ असल्याची धमकी दिलीये?

‘झी न्यूज’चे संपादक सुधीर चौधरी यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा अवघ्या १२ सेकंदांचा व्हिडीओ शेअर करत राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी ‘झी न्यूज’ला धमकी दिली असल्याचा दावा केलाय.

सुधीर चौधरींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राकेश टिकैत म्हणताहेत, ‘अगला टार्गेट मीडिया हाउस है. आप को बचना है तो साथ दे दो. नहीं तो आप भी गए’. चौधरींचं हे ट्विट ५००० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय. 

अर्काइव्ह

‘झी न्यूज’ने बुलेटिनमध्ये देखील ही बातमी चालवली आहे. ‘झी न्यूज’च्या वेबसाईटवर ही बातमी बघायला मिळते.

अर्काइव्ह

भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी टी रवी यांनी देखील हा व्हिडीओ पोस्ट करत राकेश टिकैत यांनी माध्यमांना धमकी दिली असल्याचा दावा केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

सुधीर चौधरींनी ट्विट केलेला व्हिडीओ अवघ्या १२ सेकंदांचा असल्याने टिकैत नेमके कुठल्या संदर्भाने बोलताहेत हे समजायला मार्ग नाही. त्यामुळे आम्ही टिकैत यांच्या प्रतिक्रियेचा मूळ व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला ANI या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाउंटवर राकेश टिकैत यांच्या संपूर्ण प्रतिक्रियेचा व्हिडीओ बघायला मिळाला.

छत्तीसगढमध्ये पोहोचलेल्या राकेश टिकैत यांना पत्रकारांनी राज्यातील काँग्रेस सरकारविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणतात, “सरकार तो सरकार है. इनका भी कुछ ना कुछ ढुंढेंगे. ऐसा थोड़ा है कि ऐसे ही बच जाएगी सरकार. करेंगे इनका भी करेंगे.

त्यानंतर आपला मोर्चा केंद्र सरकारकडे वळवताना राकेश टिकैत म्हणतात,

“मैन तो उसे दिल्ली वाले को देख लो..जिसनै कानून बनाकै आधा देश बेच दिया…उसमें भी ध्यान बना लो… मंडियां बेच दीं मध्य प्रदेश की 182 मंडियां बेचनी निकाल दीं…छत्तीसगढ़ भी अछूता नहीं रेहणे का…अब तो ये है कि सब लोग साथ दो…अगला टार्गेट मीडिया हाउस है…आपको बचना है तो साथ दे दो नहीं तो आप भी गए…धन्यवाद जी।”

राकेश टिकैत यांची संपूर्ण प्रतिक्रिया ऐकल्यानंतर स्पष्ट होते की ते सरकारचे पुढचे टारगेट मीडिया हाउस असल्याचे सांगताहेत. माध्यमांशी बोलताना माध्यम प्रतिनिधींना उद्देश्यून ते म्हणतात की तुम्हाला वाचायचं असेल तर आम्हाला साथ द्या.

भारतीय किसान युनिअनच्या ट्विटर अकाऊंटवरून देखील संपूर्ण प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात टिकैत यांनी सरकारचे पुढचे टारगेट मीडिया हाउस असल्याचे म्हण्टल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एका पक्षाच्या आयटी सेलकडून एडिटेड व्हिडिओच्या आधारे टिकैत यांनी मीडियाला धमकी दिल्याचा दुष्प्रचार केला जात असल्याचे देखील या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी माध्यमांना धमकी दिलेली नाही. टिकैत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सरकारचे पुढचे टार्गेट मीडिया हाउस असणार आहेत. वाचायचं असेल तर आम्हाला साथ द्या, असे म्हंटले होते. ‘झी न्यूज’चे संपादक सुधीर चौधरी यांनी एडिटेड व्हिडिओच्या आधारे चुकीचा दावा केला आणि त्याच आधारे ‘झी न्यूज’ने फेक न्यूज चालवली.

हेही वाचा- शेतकरी आंदोलनातील भारतविरोधी म्हणून व्हायरल व्हिडिओ अमेरिका आणि पाकिस्तानातले!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा