सोशल मीडियावर राहुल गांधींचा (Rahul Gandhi) एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी महात्मा गांधींविषयी (Mahatma Gandhi) बोलताहेत. हा व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की राहुल गांधी आपले महात्मा गांधी यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगताहेत. याआधारे राहुल गांधींची खिल्ली उडवली जातेय.
पडताळणी:
महात्मा गांधींचे निधन 30 जानेवारी 1948 रोजी झाले, तर राहुल गांधींचा जन्म 19 जून 1970 रोजीचा. म्हणजेच महात्मा गांधी आणि राहुल गांधी यांच्यात कसलाही संवाद होणे शक्यच नव्हते. त्यामुळे राहुल गांधींनी अशा प्रकारचा दावा केला असल्याची शक्यताच नाही. म्हणून राहुल गांधींचा हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.
व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता राहुल गांधी यांच्या अधिकृत युटयूब चॅनेलवरून 26 फेब्रुवारी 2022 रोजी अपलोड करण्यात आलेले राहुल गांधी यांचे भाषण बघायला मिळाले. राहुल गांधी यांनी गुजरातच्या द्वारकेमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिर कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ याच भाषणातील आहे.
भाषणाच्या व्हिडिओमध्ये 26 मिनट 27 सेकंदापासून पुढे बोलताना राहुल गांधी म्हणतात की, “मेरे परदादा भी गांधी जी के साथ काम करते थे। मैंने उनकी एक चिट्ठी पढ़ी थी जो गांधी जी के बारे में लिखी थी किसी को। चिट्ठी में नेहरू जी लिखते हैं कि इस मामले पर गांधी जी के साथ मेरी बातचीत हुई। मेरा पूरा मन और मेरी पूरी लॉजिक इस मामले में कह रही है कि इस मामले में गांधी जी गलत बोल रहे हैं और मैं सही बोल रहा हूं मगर अंदर से मैं जानता हूं कि मेरा दिमाग कह रहा कि वो गलत हैं और मैं सही हूं, लेकिन वो सही हैं, मैं गलत हूँ।
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राहुल गांधींचा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय. राहुल गांधी यांनी आपण स्वतः महात्मा गांधींशी संवाद साधल्याचा दावा केलेला नाही, तर ते पंडित नेहरूंच्या संदर्भाने बोलत होते. पंडित नेहरूंनी गांधीजींसंदर्भात लिहिलेल्या चिट्ठीचा उल्लेख करताना राहुल गांधींनी जे आपल्या भाषणात म्हंटलं होतं, ते चुकीच्या संदर्भाने व्हायरल करून राहुल गांधींची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा- राहुल गांधी जीथे माफी मागायची तिथे धन्यवाद देतायत? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
[…] […]