सोशल मीडियावर बीबीसीच्या बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. या स्क्रिनशॉटच्या आधारे दावा केला जातोय की काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जगातील तिसरे सर्वात विश्वासू नेते (3rd trustworthy leader) घोषित करण्यात आले आहे.
Advertisement
श्रेया नामक ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आलेला आलेलं यासंदर्भातलं ट्विट ४५६ युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.
पडताळणी:
- व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही गुगल सर्चची मदत घेतली. आम्ही व्हायरल स्क्रिनशॉटमधील बातमीची हेडलाईन जशीच्या तशी गुगलवर शोधली, मात्र राहुल गांधींना (Rahul Gandhi) जगातील तिसरे विश्वासार्ह नेते (3rd trustworthy leader) घोषित करणारी बीबीसीची बातमी काही आम्हाला मिळाली नाही.
- आम्ही बीबीसीच्या वेबसाईटवर देखील स्वतंत्ररित्या व्हायरल स्क्रिनशॉट संदर्भातील बातमी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे देखील आम्हाला अशा प्रकारची कुठलीही बातमी मिळाली नाही.
- व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये ‘फिचर्स अँड अनालिसिस’ कॉलममध्ये प्रसिद्ध बीबीसीचे अजून दोन लेख दिसताहेत. आम्ही गुगलवर किवर्डसच्या साहाय्याने बीबीसीवरील दोन्ही लेखांचा शोध घेत घेतला असता ते दोन्हीही लेख आम्हाला मिळाले.
- ‘Neglect and abuse? The lost boy and Japan’s parenting debate’ हा लेख बीबीसीच्या वेबसाईटवर ३ जून २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून ‘Dark History:Looking Into the massacres of Indonesia’s past’ हा दुसरा लेख २ जून २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
- व्हायरल स्क्रिनशॉटमधील इतर लेख वेबसाईटवर उपलब्ध असताना राहुल गांधी यांच्या संदर्भातील बातमीचे वेबसाईटवर नसणे, हे सिद्ध करते की बीबीसीने राहुल गांधी हे जगातील तिसरे विश्वासार्ह नेते असल्याचे सांगणारी कुठलीही बातमी दिली नव्हती. व्हायरल स्क्रिनशॉट एडिटेड आहे.
- बीबीसीने बातमी प्रसिद्ध केली होती आणि काही कारणास्तव नंतर ती डिलीट करण्यात आली असे मानायला देखील जागा नाही, कारण इतर कुठल्याही वेबसाईटवर किंवा माध्यमामध्ये यासंदर्भातील बातमी प्रकाशित करण्यात आलेली नाही.
- व्हायरल स्क्रिनशॉटमधील बातमीचा आधार WIN/Gallup International वरील सर्व्हे असल्याचं स्क्रिनशॉटमधील बातमीत सांगण्यात आलंय. आम्ही WIN/Gallup International च्या वेबसाईटवर २०१६ या वर्षातील सर्व सर्व्हे शोधून बघितले. मात्र आम्हाला असा कुठलाही सर्व्हे मिळाला नाही, ज्याच्या निष्कर्षानुसार राहुल गांधी यांना जगातील तिसरे सर्वात विश्वासार्ह नेते म्हणून घोषित केलेलं आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर जगातील तिसरे सर्वात विश्वासार्ह नेते म्हणून राहुल गांधी यांना निवडण्यात आल्याचे दावे चुकीचे आहेत. संबंधित दाव्यांसाठी वापरण्यात आलेल्या बीबीसीच्या बातमीचा स्क्रिनशॉट एडिटेड आहे. बीबीसीने यासंदर्भातील कुठलीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही.
हेही वाचा- इंदिरा गांधींच्या मृतदेहासमोर राहुल आणि राजीव गांधी ‘कलमा’ पठण करत होते?
Be First to Comment