Press "Enter" to skip to content

‘युक्रेन वादात हस्तक्षेप केल्यास होतील गंभीर परिणाम’, पुतीन यांची भारताला धमकी? वाचा सत्य!

सोशल मीडियावर CNN या इंग्रजी वृत्तवाहिनीचा एक स्क्रिनग्रॅब व्हायरल होतोय. या स्क्रिनग्रॅबच्या आधारे दावा केला जातोय की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांनी भारताला युक्रेन विवादात न पडण्याची ताकीद दिली आहे. भारताने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्याची धमकी पुतीन यांनी दिली असल्याचे सांगितले जातेय.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा स्क्रिनग्रॅब मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

Putin warned india news screenshot on FB
Source: facebook

पडताळणी:

व्हायरल स्क्रिनशॉट रिव्हर्स सर्चच्या आधारे शोधला असता CNN वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवरील रिपोर्ट बघायला मिळाला. त्यावर लिहिलेले बघायला मिळतेय की “वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांनी 2020 सालच्या अमेरिकन राष्टध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या दाव्यांची खिल्ली उडविली. पुतीन यांची नवीन पंचलाईन”

‘The Lead CNN’ या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देखील यासंदर्भात ट्विट करण्यात आले होते.

यावरून स्पष्ट होते की CNN च्या साधारणतः अडीच वर्षांपूर्वीच्या रिपोर्टच्या स्क्रिनग्रॅबशी छेडछाड करण्यात आली असून मूळ स्क्रिनग्रॅबमध्ये चुकीचा मजकूर लिहिण्यात आला आहे.

PutiN warned India not to interfere claim debunked

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी भारताला धमकावले असल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. CNN वृत्तवाहिनीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भातील रिपोर्टच्या स्क्रिनग्रॅबशी छेडछाड करून चुकीचे दावे केले जाताहेत.

हेही वाचा- युक्रेनवर रशियन हल्ल्याचा म्हणून न्यूज चॅनेल्सनी चालवला जुना व्हिडीओ!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा