Press "Enter" to skip to content

पोलिसांनी बुरखा घातलेल्या आरएसएस कार्यकर्त्याला पाकिस्तानचा झेंडा फडकवताना पकडलंय ?

सोशल मीडियात काही फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होताहेत. दावा करण्यात येतोय की बुरखा घालून पाकिस्तानचा झेंडा फडकवताना आरएसएसच्या कार्यकर्त्याला पकडण्यात आले आहे.

रिचा आपटे ह्यांनी फेसबकूवर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यात बुरखा घातलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडलं असल्याचं दिसतंय. आपटे यांनी दावा केलाय की सदर व्यक्ती आरएसएसचा कार्यकर्ता असून त्याला बुरखा घालून पाकिस्तानचा झेंडा फडकवताना ताब्यात घेण्यात आलाय. हा व्हिडीओ १३ हजार फेसबुक युजर्सनी शेअर केलाय.

Advertisement
https://www.facebook.com/100036177314271/videos/308979966984578

अर्काइव्ह पोस्ट

शिवाजी गायकवाड यांनी देखील ‘बुरखा लेवूण पाकिस्तानचा झेंडा घेवून निघालेला हिंदुत्ववादी!’ कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केलाय.

facebook post claiming RSS man in burqa hoisted pak flag
Source: Facebook

ट्विटरवर मात्र हाच दावा वेगळ्या फोटोंसह व्हायरल होत असल्याचे लक्षात आले.

बुरखा घातलेल्या युवकाला मारहाण करतानाचा फोटो आणि शेजारी भारतीय जनता पक्षाच्या फ्लेक्सवरील त्याचा फोटो असे एकत्र व्हायरल होत आहेत.

अर्काइव्ह पोस्ट

साधारणतः याच फोटोंसह हाच दावा पुढे घेऊन जाणारं ट्विट निशा खान या ट्विटर हँडलवरून करण्यात आलंय. या ट्विटला देखील ५८४ रिट्विट मिळालेत.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोध घेतला. आम्हाला ईटीव्ही आंध्र प्रदेशच्या युट्यूब चॅनेलवर ७ ऑगस्ट २०२० रोजी अपलोड करण्यात आलेली एक बातमी मिळाली.

बातमीनुसार घटना आंध्र प्रदेश मधील कुर्नूल येथील असून पोलिसांनी अवैधरित्या दारू घेऊन जात असणाऱ्या बुरखाधारी इसमांना ताब्यात घेतलं होतं.

व्हायरल व्हिडीओच्या संदर्भात कुर्नुलचे एसपी डॉ. फकीरप्पा कागिनेल्ली यांचं एक ट्विट देखील आम्हाला मिळालं. त्यात त्यांनी व्हिडीओसोबत केला जाणारा दावा चुकीचा असल्याचं सांगितलंय.

ट्विटमध्ये कागिनेल्ली यांनी म्हंटलंय की, “व्हिडिओत दिसणाऱ्या बुरखाधारी व्यक्तीला पोलिसांनी तेलंगणातून आंध्र प्रदेशातील कुर्नुलमध्ये अवैधरित्या दारू घेऊन जाताना पकडले आहे. सदरील घटना ७ ऑगस्ट रोजीची असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच चुकीची माहिती न पसरविण्याचं आवाहन देखील केलंय.

दुसऱ्या घटनेची पडताळणी करत असताना साधारतः दोन महिन्यांपूर्वी देखील हाच दावा व्हायरल झाला होता, हे लक्षात आले.

‘कर्नाटक के विजयपूर जिले में बुर्का पहनकर पाकिस्तानी झंडा फहराता बीजेपी कार्यकर्ता सिद्धू परगोंड पकडा गया.’ अशा कॅप्शनसह हे दावे व्हायरल झाले होते. तेच फोटो आता परत नव्याने व्हायरल केले जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

https://www.facebook.com/photo.php?fbid=2173387992807221&set=pcb.2173388086140545&type=3&theater

या घटनेच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम घटना कुठली आहे याचा शोध घेतला. ट्विटरवर या बाबतीत सर्च केलं असता आम्हाला एक ग्राफिक पोस्ट सापडली.

BJP activist held wearing burqa location info image
credit: twitter

या ग्राफिकमधील माहितीप्रमाणे स्थानिकांनी बुरखाधारी भाजप कार्यकर्ता सिद्दप्पा परागोंड याला पकडून विजापूरच्या सिंदगी पोलीसांच्या ताब्यात दिल्याचे समजले. हाच धागा पकडत प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी आम्ही सिंदगी पोलीस स्टेशनचे पीएसआय संगम होसामनी यांच्याशी संपर्क साधला.

त्यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी केली असता त्यांनी घटनेला दुजोरा देत घटना खरी असून पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. त्या तरुणाने नेमक्या कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले यासंदर्भात अधिक तपास चालू असल्याचे पीएसआय संगम होसामनी यांनी ‘चेकपोस्ट मराठी’शी बोलताना सांगितले.

संबंधित युवकाने खरंच पाकिस्तानचा झेंडा फडकावला होता का याविषयी आम्ही त्यांच्याकडे विचारणा केली त्यावेळी असं काही घडल्याचं त्यांनी नाकारलं. ‘पाकिस्तानचा झेंडा वगैरे फडकवला नाही’ असं ते म्हणाले.

आम्ही आरोपीच्या नावासंदर्भात विचारणा केली असता, आरोपीचे नाव ‘सिद्धू परागोंड’ असल्याचे मात्र त्यांनी कन्फर्म केले.

दरम्यान व्हायरल होत असणाऱ्या फोटोज, व्हिडीओज मध्ये आम्हाला कुठेही पाकिस्तानचा झेंडा आढळला नाही. व्हिडीओत ऐकू येणाऱ्या लोकांच्या आवाजातही कुठे झेंड्याचा उल्लेख नाही.

फेसबुकवर ‘सिद्धू परागोंड’ या नावाने सर्च केले असता आम्हाला या नावाने दोन अकाऊंट सापडले. दोन्हीही अकाऊंट फारसे सक्रीय नसल्याचे आढळले. परंतु वॉलवर भाजपा नेत्यासोबतचे, कमळ चिन्ह असलेले काही फोटोज सापडले.

हे फोटोज २०१८ मधील आहेत. म्हणजेच त्याच्या नावे कुणी फेक अकाउंट काढून हे फोटोज टाकले असण्याच्या शक्यता इथेच मावळतात.

https://www.facebook.com/photo.php?fbid=120345755485642&set=ecnf.100025306549509&type=3&theater
https://www.facebook.com/photo.php?fbid=120299492156935&set=ecnf.100025306549509&type=3&theater

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल पोस्ट्समधील दावे अर्धसत्य असल्याचे समोर आले.

पहिली घटना आंध्र प्रदेश मधील कुर्नुल येथील असून पोलिसांनी बुरखा घातलेल्या तरुणांना अवैधरित्या दारू घेऊन जाताना पकडले आहे. त्याचा पाकिस्तानचा झेंडा फडकावण्याशी काहीही संबंध नाही.

दुसरी घटना कर्नाटकातील आहे. सिंदगी पोलीस स्टेशनचे पीएसआय संगम होसामनी यांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच आम्ही व्हायरल पोस्टमधील फोटोज आणि व्हिडीओजच्या केलेल्या बारीक निरीक्षणानुसार पाकिस्तानी झेंड्याची बाब खऱ्या घटनेला कुणीतरी जोडलेली आहे.

त्याचवेळी ‘सिद्धू परगोंड’ याचा भाजपा नेत्याशी असणारा संबंध फेसबुकवरील फोटोज पाहून लक्षात येतोय. शिवाय तो बुरखा घालून फिरताना आढळला हे सुद्धा शत प्रतिशत खरे आहे.

हे ही वाचा:

‘इतना डर काफी है तुम्हारे लोगो के लिये’ म्हणणारा मुस्लीम इसम मालेगाव मधला नाही

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा