Press "Enter" to skip to content

टोस्टला थुंकी लावणारा व्हायरल व्हिडीओतील बेकरी कामगार ‘आदिल’ पोलिसांच्या ताब्यात? वाचा सत्य!

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक शिसारी आणणारा किळसवाना व्हिडीओ व्हायरल होतोय. यात बेकरी कामगार टोस्टवर पाय ठेवत आहे, दुसरा एक जण त्यावर थुंकून, ते चाटून मग प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करत आहे.

Advertisement

व्हिडीओ नेमका कुठला असा प्रश्न सर्वांनाच सतावत असताना सोशल मीडियावर मात्र याप्रकरणी पोलिसांनी ‘आदिल’ नावाच्या कामगाराला अटक झाली असून ‘हाज़ी इबरार अहमद’ याच्या बेकरीस सील केले असल्याचे दावे व्हायरल होतायेत.

‘टोस्ट को चाट कर पैक करने वाले मोहम्मद आदिल को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है और हाज़ी इबरार अहमद की बेक़री बनाने वाली फैक्ट्री को भी सील कर दिया गया है।’ असे दावे करणाऱ्या Dr.APR या ट्विटचे स्क्रिनशॉट व्हायरल होतायेत.

Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निसार अली यांनी व्हॉट्सऍपवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या ट्विटच्या स्क्रिनशॉटविषयी माहिती देत पडताळणीची विनंती केली.

हेच स्क्रिनशॉट फेसबुकवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’कडे यापूर्वीच व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे, यावर काही कायदेशीर कारवाई झाली का? अशी विचारणा अनेक वाचकांकडून करण्यात आली होती. तेव्हापासूनच आम्ही याविषयी पोलीस प्रशासन किंवा अन्न व औषध प्रशासन यांसारख्या अधिकृत विभांगाकडून माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. परंतु अद्यापपर्यंत आम्हाला तशी काही माहिती मिळू शकलेली नाही.

व्हायरल स्क्रिनशॉटच्या मुळाशी जाण्यासाठी Dr.APR या ट्विटर हँडलवर आम्ही पोहचलो. हे ट्विट करताना त्याने कामगाराचे आणि बेकरी मालकाचे नाव नेमक्या कोणत्या ठिकाणाहून घेतले. या माहितीचा स्रोत कोणता, याविषयीची कुठलीही माहिती नाही.

अर्काइव्ह

याच ट्विटवर अनेक जागरूक युजर्सकडून माहितीच्या स्रोताची मागणी करणाऱ्या कमेंट्स करण्यात आल्या आहेत. परंतु त्यावरही कुठलाही रिप्लाय देण्यात आलेला नाही. सदर युजरच्या प्रोफाईलवर यापूर्वी अनेक मुस्लिमद्वेष्टया पोस्ट करण्यात आलेल्या आहेत.

हिंदी, मराठी, इंग्रजी सर्वच भाषांतील कीवर्ड्स वापरून गुगलसर्च करूनही व्हिडीओ नेमका कुठला आणि त्यावर कायदेशीर कारवाई झाली की नाही याविषयी माहिती देणारी एकही अधिकृत माध्यमाची बातमी आम्हाला सापडली नाही. केवळ व्हायरल व्हिडीओ काय आहे आणि त्यावर नेटकऱ्यांनी काय संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत एवढेच सांगणाऱ्या बातम्या सध्या उपलब्ध आहेत. याचाच अर्थ असा की मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये देखील ही घटना नेमकी कुठली याविषयीची माहिती उपलब्ध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की सोशल मीडियात केल्या जाणाऱ्या दाव्यांना कुठलाही ठोस आधार नाही. व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, यातील दोषींना ताब्यात घेण्यात आले आहे किंवा नाही, याविषयीची कुठलीही माहिती सध्या तरी उपलब्ध नाही.

अशा परिस्थितीत व्हायरल व्हिडीओतील कामगार ‘आदिल’ आणि बेकरीचा मालक ‘हाज़ी इबरार अहमद’ असल्याचे सांगून धार्मिक विद्वेष पसरवण्याचा खोडसाळपणा केला जात आहे.

व्हायरल व्हिडीओविषयी अधिकृत माहिती मिळाल्यास येथेच अपडेट केली जाईल. तोवर अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊन स्वतःची दिशाभूल करून घेऊ नका.

हेही वाचा: हुक्का बारमधील छाप्यात मुस्लिम तरुणांसोबत १५ हिंदू तरुणी सापडल्याचे दावे चुकीचे!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

5 Comments

  1. Anonymous Anonymous September 21, 2021

    हा घृणास्पद विडीओ अगदी खरा आह्रे व्हाट्सप वर आलेला

    • checkpostmarathi checkpostmarathi September 21, 2021

      व्हिडीओ खराच आहे परंतु त्यातील लोक मुस्लीम असल्याचे अधिकृत प्रशासकीय विभागांकडून समजण्या अगोदरच काही लोक मुस्लीम नावे वापरत पुन्हा तो व्हिडीओ व्हायरल करत आहेत. हा बातमीच मुद्दा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा