Press "Enter" to skip to content

राष्ट्रीय तपास संस्थेकडून मुस्लिम दहशतवाद्यांची माहिती देण्यासाठी नंबर जारी करण्यात आलाय?

सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात येतोय की राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडून मुस्लिम दहशतवाद्यांची माहिती देण्यासाठी एक विशेष नंबर जारी करण्यात आला आहे. व्हायरल पोस्टमध्ये एक नंबर देखील शेअर केला जातोय.

Advertisement

फेसबुक, ट्विटर किंवा इतर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘सर तन से जुदा’ नारा देणारी कुठलीही मुस्लिम व्यक्ती आढळली की फक्त एक स्क्रीनशॉट घ्या, लिंक कॉपी करा आणि 011-24368800 या नंबरवर कॉल करा, असे या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे.

अर्काइव्ह

पडताळणी:

आम्ही व्हायरल मेसेजमधील क्रमांकाच्या आधारे शोध घेतला असता ANI या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हॅण्डलवरून 17 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आलेले ट्विट बघायला मिळाले.

ANI च्या या ट्विटमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) सोशल मीडियावर ISIS विचारसरणीचा प्रचार करणार्‍या किंवा तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांविरुद्ध तक्रारी नोंदवण्यासाठी -011-24368800- हा हॉटलाइन क्रमांक जारी करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली होती.

राष्ट्रीय तपास संस्थेचे जनसंपर्क अधिकारी विजयंता आर्य यांनी देखील बूमलाईव्हशी सोशल मीडियावरील व्हायरल दावे खोडून काढले आहेत. त्यांनी 7 जुलै 2022 रोजी राष्ट्रीय तपास संस्थेकडून जारी करण्यात आलेली प्रेस रिलीज देखील शेअर केली, ज्यामध्ये व्हायरल दाव्यांचे खंडन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस रीलिजमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की सर्वांना कळविण्यात येते की, NIA ने असा कुठलाही मेसेज जारी केलेला नाही. सोशल मीडियावरील दावे पूर्णपणे खोटे आणि द्वेषाने भरलेले आहेत. त्यांच्यामार्फत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्याकडुन लोकांना अशा मेसेजेसपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राष्ट्रीय तपास संस्थेकडून मुस्लिम दहशतवाद्यांची माहिती देण्यासाठी विशेष नंबर जारी करण्यात आलेला नाही. व्हायरल दावे चुकीचे आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेकडून या दाव्यांचे खंडन करण्यात आले आहे.

हेही वाचा- सोशल मीडियाच्या दबावापुढे झुकले सर्वोच्च न्यायालय? बदलला नुपूर शर्मा प्रकरणातील निकाल?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा