fbpx Press "Enter" to skip to content

न्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करणारा लेख लिहिलाय?

सोशल मीडियावर दावा केला जातोय की न्यूयॉर्क टाईम्सचे मुख्य संपादक जोसेफ होप यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर लेख लिहिलाय (joseph hopp article on modi). लेखामध्ये मोदींचे कौतुक करण्यात आले असून मोदींचे नेतृत्व हे जगातील महासत्तांसमोरचे सर्वात मोठे आव्हान असल्याचं म्हंटलंय.

अंशुमान बोस या ट्विटर युजरने यासंदर्भात एक ट्विट केलंय. त्यात ते जोसेफ होप (joseph hopp article on modi) यांच्या हवाल्याने म्हणतात, “भारताला एक सर्वोत्तम देश बनविणे हेच नरेंद्र मोदी यांचे एकमेव उद्दीष्ट आहे. त्यांना योग्य वेळी थांबवण्यात आलं नाही, तर भविष्यात भारत जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनेल. अमेरिका, युनायटेड किंगडम आणि रशिया यांसारख्या महासत्ता देखील भारताच्या कामगिरीने आश्चर्यचकित होतील” 

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

व्हाट्सअपवर देखील जोसेफ होप यांच्या नावाने असाच एक मोठा लेख शेअर केला जातोय.

पडताळणी:

आम्ही सर्वप्रथम ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असा काही लेख प्रसिद्ध करण्यात आलाय का हे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला अशा प्रकारचा कुठलाही लेख बघायला मिळाला नाही.

त्यानंतर आम्ही ‘न्यूयॉर्क टाईम्स’चे मुख्य संपादक म्हणून ज्यांचा उल्लेख करण्यात आलाय त्या जोसेफ होप यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये जोसेफ होप नावाची कुठलीही व्यक्ती काम करत असल्याची पुष्टी होऊ शकली नाही. शिवाय न्यूयॉर्क टाईम्सच्या मुख्य संपादक पदाची जबाबदारी देखील डीन बेकेट हे सांभाळत असल्याचे समजले.

त्यानंतर न्यूयॉर्क टाईम्सच्या कम्युनिकेशन टीमच्या अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आलेलं एक ट्विट देखील बघायला मिळालं. या ट्विटमध्ये भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूयॉर्क टाईम्सशी संबंधित खोटा दावा फिरत असल्याचं सांगण्यात आलंय. सोबत ‘लॉजिकल इंडियन’ने यासंदर्भात केलेल्या फॅक्ट चेकच्या बातमीची लिंक देखील देण्यात आलीये.

न्यूयॉर्क टाईम्सच्या प्रवक्त्या एरी आइज़ैकमैन बेवाक्वा यांनी ‘लॉजिकल इंडियन’ला मेलच्या माध्यमातून कळवले की ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये जोसेफ होप नावाची कुठलीही व्यक्ती कार्यरत नाही. न्यूयॉर्क टाईम्सचे संपादक डीन बेकेट असून ते २०१४ पासून या पदावर आहेत. बेकेट यांनी अशा प्रकारचा कुठलाही लेख लिहिलेला नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूयॉर्क टाईम्स यांच्याशी संबंधित दावा चुकीचा आहे. ना न्यूयॉर्क टाईम्सने नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारा कुठला लेख लिहिला आहे, ना न्यूयॉर्क टाईम्समध्ये जोसेफ होप नावाची कुणी व्यक्ती कार्यरत आहे.

सध्या डीन बेकेट हे न्यूयॉर्क टाईम्सचे संपादक असून २०१४ सालापासून तेच ही जबाबदारी सांभाळत आहेत. जोसेफ होप हे एक काल्पनिक नाव असून या नावाची कुठलीही व्यक्ती न्यूयॉर्क टाईम्सशी संबंधित नाही.

हे ही वाचा- नरेंद्र मोदींना ‘विश्वनेता’ संबोधणारे जो बायडन यांचे ट्विटर हँडल फेक!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा