Press "Enter" to skip to content

नेदरलॅंडमध्ये पाचवीच्या वर्गापासून गीता शिकविणे अनिवार्य करण्यात आले आहे का?

सोशल मीडियावर एक ग्राफिक व्हायरल होतंय. ग्राफिकमध्ये दोन लहान मुलं दिसताहेत आणि त्यांच्या हातात भगवद्गीता बघायला मिळतेय. दावा केला जातोय की नेदरलँडमध्ये (Netherlands) कायदा करण्यात आलाय. या कायद्यान्वये पाचवीच्या वर्गापासून गीता (Gita) शिकवणे बंधनकारक करण्यात आले आहे. नेदरलँडच्या सर्व शाळांमध्ये गीतेचे धडे देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Advertisement

पडताळणी:

  • आम्ही व्हायरल दाव्याची पडताळणी करायला घेतली त्यावेळी लक्षात आलं की नेदरलॅंडमध्ये (Netherlands) पाचवीच्या वर्गापासून गीतेचा (Gita) क्लास घेणे बंधनकारक करण्यात आल्याचा दावा अनेक वर्षांपासून व्हायरल होतोय.

अर्काइव्ह

  • दाव्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला असता ‘इस्कॉन डिझायर ट्री’च्या वेबसाईटवर आम्हाला एक बातमी सापडली.
  • या बातमीमध्ये नेदरलँड्सने पाचवीच्या मुलांसाठी भगवद्गीता विषय सुरु केला असल्याचे म्हंटले आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या ग्राफिकमधील फोटो देखील याच बातमीतला आहे.
  • त्यानंतर आम्हाला नेदरलँड सरकारच्या वेबसाईटवर देशातील शाळांसाठी अनिवार्य विषयांची यादी मिळाली.
  • या यादीमध्ये डच, इंग्रजी, गणित, सामाजिक शास्त्र आणि पर्यावरण, सर्जनशील अभिव्यक्ती आणि क्रीडा या विषयांचा समावेश असल्याचे समजले. यामध्ये कुठेही गीतेचा समावेश बघायला मिळाला नाही.
Source: Netherland Govt
  • कोरावर यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नावर उत्तर देताना देखील नेदरलँडच्या अनेक नागरिकांनी ही गोष्ट फेटाळली आहे. अनेकांनी आपल्या मुलांच्या शाळेत गीता अनिवार्य नसल्याचे सांगितले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल ग्राफिकमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. नेदरलॅंडने पाचवीच्या वर्गापासून गीता शिकविणे अनिवार्य केलेले नाही. सोशल मीडियावर हा दावा गेल्या अनेक वर्षांपासून व्हायरल आहे.

हेही वाचा- मक्का मदिनातील खऱ्या ‘मक्केश्वरनाथ शिवलिंगाचे’ दर्शन घडले आहे?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा