Press "Enter" to skip to content

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर एनसीबीची धाड?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये शाहरुखचा चेहरा लाल झालेला बघायला मिळतोय. दावा करण्यात येतोय एनसीबीने (ncb) शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यावर धाड टाकल्यानंतरचा (raid on mannat) हा फोटो आहे.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या माध्यमातून शोधला असता ‘अमर उजाला’च्या वेबसाईटवर १८ मार्च २०१७ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला. शाहरुखचा हा फोटो त्यावेळचा आहे, जेव्हा तो अभिनेत्री आलिया भट्टच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहिला होता.

‘द क्विन्ट’च्या वेबसाईटवरील बातमीमध्ये देखील हा फोटो बघायला मिळाला. बातमीनुसार शाहरुख आलिया भट्टच्या घरी पोहचणार असताना शाहरुख खानच्या ड्रायव्हरने अनवधानाने गाडी एका फोटोग्राफरच्या पायावर घातली होती. त्यानंतर शाहरुखने आपल्या बॉडिगार्डला संबंधित फोटोग्राफरला तात्काळ नानावटी रुग्णालयात घेऊन जायला सांगितले तसेच मेडिकल बिल भरण्याच्या सूचना दिल्या होत्या.

The Quint 2017 news showing SRK pictures circulating now days
Source: The Quint

व्हायरल फोटो आणि बातम्यांमधील फोटो बघितला असता अगदी सहज लक्षात येते की व्हायरल फोटो एडिटेड आणि आणि तो सध्याच्या आर्यन खान प्रकरणाच्या संदर्भाने शेअर केला जातोय.

मन्नतबंगल्यावर एनसीबीची धाड?

आर्यन खान प्रकरणी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी एनसीबीची टीम (ncb) २१ ऑक्टोबर रोजी शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर गेली होती. त्यानंतर लगेचच सोशल मीडियावर एनसीबीने ‘मन्नत’ बंगल्यावर छापा (raid onmannat) टाकला असल्याचे दावे करण्यात येऊ लागले होते. अनेक माध्यमांनी देखील अशाच प्रकारचे दावे करणाऱ्या बातम्या दिल्या होत्या.

दरम्यान, खुद्द एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडूनच ‘मन्नत’वरील धाडीचे दावे फेटाळून लावण्यात आले होते. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीची टीम तिथे गेली होती, असे स्पष्ट करण्यात आले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की एनसीबीकडून शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर धाड टाकण्यात आलेली नाही. शिवाय मन्नतवरील धाडीनंतरचा म्हणून व्हायरल होत असलेला फोटो देखील एडिटेड आहे. शिवाय हा फोटो सध्याचा नसून जवळपास ४ वर्षांपूर्वीचा आहे.

हेही वाचा- आर्यन खान ड्रग केस प्रकरणी अटक झालेल्यांमध्ये सर्व मुले मुस्लीम आणि मुली हिंदू आहेत? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा