Press "Enter" to skip to content

नासाच्या वैज्ञानिकाने कुटुंबासह स्वीकारला हिंदू धर्म? वाचा सत्य!

अमेरिकेतील नासा (NASA) या संस्थेच्या पॉल अँडरसन (Paul Anderson) या वैज्ञानिकाने आपल्या परिवारातील सदस्यांसह सनातन हिंदू धर्म स्वीकारला अशा दाव्यांसह एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

“यह नासा के जानेमाने वैज्ञानिक पॉल एंडरसन है, जिन्होंने अमेरिका में रहते हुए सपरिवार हिंदू धर्म अंगीकार किया है हिन्दू बहन-बेटियां अपने धर्म की महत्ता समझो, #सनातन_धर्म_सर्वश्रेष्ठ_हैअशा कॅप्शनसह भगवी वस्त्रे परिधान केलेल्या विदेशी परिवाराचा फोटो व्हायरल केला जातोय.

फेसबुकवर हे दावे व्हायरल होण्याचे प्रमाण मोठे आहे.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक ऍड. विजय दिवाणे यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

नासा सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील एवढ्या मोठ्या संस्थेच्या वैज्ञानिकाने धर्मांतर करून हिंदू धर्म स्वीकारणे ही भारतीय माध्यमांसाठी खूप मोठी बातमी आहे. परंतु अशा प्रकारची माहिती देणारी एकही बातमी आम्हाला बघायला मिळाली नाही.

व्हायरल ईमेज गुगल, यांडेक्स या सर्च इंजिन्सवर रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिली परंतु फेसबुक, ट्विटर यांसारख्या समाज माध्यमांशिवाय एकही अधिकृत वेबसाईट किंवा पोर्टलवर हा फोटो पहायला मिळाला नाही.

नासा मध्ये ‘पॉल अँडरसन’ नामक कुणी वैज्ञानिक आहेत का? हे पडताळण्यासाठी आम्ही नासाच्या अधिकृत वेबसाईटवर ‘स्टाफ लिस्ट’मध्ये कधी पॉल, कधी अँडरसन तर कधी ‘ पॉल अँडरसन’ असे सर्च करून पाहिले परंतु अशा नावाची एकही व्यक्ती नासाच्या कर्मचाऱ्यांत सापडली नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये नासामध्ये कुणी ‘पॉल अँडरसन’ नावाचे वैज्ञानिक कार्यरत असल्याचे पुरावे मिळाले नाहीत, तसेच अशा कुठल्या व्यक्तीने हिंदू धर्म स्वीकारल्याची कुठेही अधिकृत बातमी नाही. भगवी वस्त्रे परिधान केलेल्या विदेशी पर्यटकाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल करून जे दावे व्हायरल होत आहेत ते फेक आहेत.

हेही वाचा: भारताचे मूळ राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांचे नसून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आहे? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा