Press "Enter" to skip to content

नरेंद्र मोदींनी ब्रिटनमध्ये पार पडलेल्या 53 देशांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?

सोशल मीडियावर एक ग्राफिक व्हायरल होतेय. ग्राफिकमध्ये अनेकजण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे टाळ्या वाजवून स्वागत करताना दिसताहेत. ग्राफिकवर लिहिलेले आहे की, “200 साल तक हमे गुलाम बनाने वाले ब्रिटेन मे कल 53 देशों के अध्यक्षो के बीच “मोदी महाअध्यक्ष” थे| यह दृश्य देखकर हर भारतीय का सीना गर्व से चौड़ा हो गया होगा.!”

Advertisement
Source: facebook

हेच ग्राफिक ट्विटर आणि फेसबुकवर देखील व्हायरल होतंय.

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आमच्या असे देखील लक्षात आले की हाच फोटो याच कॉपीपेस्ट दाव्यांसह 2018 साली देखील व्हायरल झाला होता.

आर्काइव्ह

फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला DNA च्या वेबसाईटवर 23 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला.

Source: DNA

बातमीनुसार फोटो स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल बिजनेस कौन्सिलच्या’ बैठकी दरम्यानचा आहे. बैठकीला जागतिक पातळीवरील महत्वाच्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी हे सर्वजण दावोस येथे जमले होते.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी देखील 23 जानेवारी 2018 रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हाच फोटो केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘इंटरनॅशनल बिझनेस कौन्सिल’च्या बैठकीत जगभरातील महत्वाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचे त्यांनी आपल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडियावरील व्हायरल फोटोसोबत करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. फोटो ब्रिटनमधील नसून स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल बिजनेस कौन्सिलच्या’ बैठकी दरम्यानचा आहे.

हेही वाचा- पंतप्रधान मोदींचे कुटुंबीय वडलांच्या मृत्यूसाठी मोदींनाच जबाबदार मानतात?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा