Press "Enter" to skip to content

ठाकरे सरकारच्या काळात मुंबई पोलिसांनी गाडीवर भगवा ध्वज फडकवायला बंदी घातलीय?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओत कारमध्ये बसलेली व्यक्ती मुंबई पोलिसांशी (Mumbai Police) हुज्जत घालताना दिसतेय. कारवरील भगव्या झेंड्यावरून मुंबई पोलीस आणि कारमधील व्यक्ती यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होताना बघायला मिळतेय.

Advertisement

मुंबईत भगवा चालणार नाही का? मुंबई पाकिस्तानात आहे का? अशा प्रकारचे प्रश्न कारमध्ये बसलेल्या व्यक्तीकडून पोलिसांना विचारले जाताहेत.

या व्हिडिओच्या आधारे सोशल मीडियावर दावा केला जातोय की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात मुंबई पोलिसांनी गाडीवर भगवा फडकवायला बंदी घातली आहे.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ शेअर केला जातोय. “शिवसेनेच्या सत्तेत ही पहा मुंबईची अवस्था. गाडीवर भगवा झेंडा लाऊन फिरू सुद्धा शकत नाही” असा दावा केला जातोय.

Saffron flag banned for cars viral video check post marathi fact
Source: Facebook

पडताळणी:

  • आम्ही व्हायरल व्हिडीओचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला असे आढळून आले की हाच व्हिडीओ २०१८ साली देखील व्हायरल झाला होता. आकाश दीक्षित या फेसबुक युजरने ३ एप्रिल २०१८ रोजी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता.
  • या पोस्ट मध्ये देखील दावा करण्यात आलाय की मुंबईमध्ये गाडीसोबत भगवा ध्वज घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आलीये. सुदर्शन टीव्हीचे संस्थापक सुरेश चव्हाणके यांच्यासोबत ही घटना झाली असल्याचे सांगण्यात आले होते.

☝🏻मुंबई में भगवा ध्वज को गाड़ी के साथ लेजाने पर रोक-सुदर्शन टीवी सुदर्शन वाहिनी के चेयरमेन सुरेश जी के साथ.हुई ये.घटना शेयर जरूर करो सभी भाई

Posted by Akash Dixit on Tuesday, 3 April 2018
  • हाच धागा पकडून आम्ही युट्यूबवर किवर्ड सर्च केलं असता सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ २ एप्रिल २०१८ रोजी सुदर्शन न्यूजच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले.  
  • या व्हिडीओनुसार मुंबई पोलिसांनी सुदर्शन न्यूजचे संस्थापक सुदर्शन चव्हाणके यांना त्यांच्या गाडीवरील भगवा उतरविण्यास सांगितल्याने चव्हाणके यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की २०१८ साली राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार होते. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते.

दरम्यान, या प्रकरणातील मुंबई पोलिसांची नेमकी काय बाजू होती, हे मात्र समजू शकले नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ठाकरे सरकारच्या काळात मुंबई पोलिसांनी गाडीवर भगवा ध्वज फडकवायला बंदी घातली असल्याचे दावे दिशाभूल करणारे आहेत. व्हायरल व्हिडीओ सध्याचा नसून २०१८ सालातला आहे. त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाखालील भाजप-सेना युतीचे सरकार होते.

हेही वाचा- ठाकरे सरकारने मखदूम शाह दर्ग्यावर सलामी देण्याची परंपरा सुरू केली आहे?

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा