Press "Enter" to skip to content

मोदी सरकारने अलाहाबादमधील मशीद पाडून स्थानिक मुस्लिमांना बेदम मारहाण केलीय?

‘गेल्या २० वर्षांपासून ज्याविषयी केस चालू होती ती मशीद मोदी सरकारने जमीनदोस्त केली (masjid demolished in allahabad). यात अनेक मुस्लीम बांधवाना गंभीर जखमा झाल्या. तरीही कुठल्याच मीडियामध्ये याविषयी बातमी नाही’ असे दावे करणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक जेकब डीकुन्हा यांनी व्हॉट्सऍपवर व्हायरल होणारा व्हिडीओ आमच्याशी शेअर करत सत्यतेची पडताळणी करण्याची विनंती केली.

source: whatsapp

हाच व्हिडीओ मागच्या वर्षी ट्विटर, फेसबुक सारख्या माध्यमांत सुद्धा व्हायरल होत होता.

अर्काइव्ह लिंक

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स आणि काही कीवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता असे लक्षात आले की सदर व्हिडीओ आता एवढ्यात नव्हे तर २०१८ सालापासून व्हायरल होत आहे.

2018 fb post claiming modi demolished masjid
Source: Facebook

जखमी मुस्लीम व्यक्तींचे फोटो बांग्लादेशातील:

व्हायरल व्हिडीओतील जखमी मुस्लीम व्यक्तींचे फोटोज रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहीले असता ते फोटोज बांग्लादेशातील ढाक्याचे असल्याचे समजले. १ डिसेंबर २०१८ रोजी ढाक्यात तब्लीगी जमातीचा इज्तेमा होता. यावेळी दोन गटांत नेतृत्वावरून वाद झाला आणि त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यावेळचे हे फोटोज आहेत. ते आपण ‘या‘, ‘या‘, ‘या‘ आणि ‘या‘ बातम्यांत पाहू शकता.

तुटलेल्या मशिदीचा फोटो अलाहाबादचा असल्याचे पुरावे नाहीत:

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेली मशीद अलाहाबादची (masjid demolished in allahabad) आहे का? हे तपासण्यासाठी ‘द लल्लनटॉप’ने २०१९ साली प्रयागराज (अलाहाबाद)च्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. त्यावेळी सदर व्हायरल व्हिडीओ बद्दल पोलिस खात्यास कल्पना असून ती मशीद किंवा संबंधित घटना अलाहाबाद येथील नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

रिव्हर्स इमेजसर्च मध्ये सुद्धा या फोटोचे अलाहाबाद कनेक्शन असल्याचे कुठेच सिद्ध झाले नाही. उलट अर्धकुंभ मेळ्यासाठी रस्ता रुंदीकरण चालू असताना मुस्लीम बांधवांनी स्वतःहून एकमताने अडथळा ठरत असणारी मशीद पाडली असल्याची दुसरी एक घटना आमच्या समोर आली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडीओतील दावे निराधार आणि खोटे असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील तुटलेल्या मशिदीचा अलाहाबाद म्हणजेच आताच्या प्रयागराजशी संबंध असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत.

व्हायरल व्हिडिओत दिसत असलेले जखमी मुस्लीम लोक भारतातील नसून बांग्लादेशातील आहेत. धार्मिक, राजकीय तेढ निर्माण करण्यासाठी खोडसाळपणे कुणीतरी हा व्हिडीओ वारंवार व्हायरल करत आहे.

हे ही वाचा: मशिदींवर भोंगे लावणे नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा ठरवलाय?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा