रायपूर येथील धर्मसंदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण (Kalicharan) उर्फ अभिजीत सराग यांना 30 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक करण्यात आली होती. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये स्वामी कालिचरण दिसताहेत. दावा केला जातोय की त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या पडताळणीसाठी सर्वप्रथम तर आम्ही गुगलवर किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर 3 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित बातमी बघायला मिळाली. या बातमीमध्ये छत्तीसगडच्या रायपूर येथील कोर्टाने कालिचरण यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘कालीचरण यांच्यावर जो आरोप आहे तो गंभीर स्वरूपाचा आहे’, अशी टिपण्णी करत कोर्टाने कालीचरण यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला तसेच कोर्टात हजर करण्यात आलेल्या कालिचरण यांना 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर आता कालीचरण यांच्या वकिलांनी जामिनासाठी हायकोर्टात जाण्याचे ठरवले असल्याचे देखील बातमीमध्ये सांगण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे शोधण्यासाठी व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या असता IBC24 या यूट्यूब चॅनेलवरून 30 डिसेंबर 2021 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ रिपोर्ट बघायला मिळाला. या रिपोर्टमधील दृश्ये व्हायरल व्हिडिओतील दृश्यांशी मिळती-जुळती आहे.
रिपोर्टनुसार रायपूर पोलिसांनी 30 डिसेंबर रोजी कालिचरण यांना अटक केली. अटकेनंतर कालिचरण यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टासमोर कालिचरण यांचे समर्थक जमले होते. ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत होते. समर्थकांच्या गोंधळामुळे कोर्टाची सुनावणी देखील बंद दरवाज्याआड करण्यात आली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कालिचरण यांना जामीन मंजूर झालेला नाही. व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. रायपूर कोर्टाने कालिचरण यांना १३ जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
हेही वाचा- कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लीम गटाने हल्ला केल्याचे दावे फेक! वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment