पत्रकार प्रज्ञा मिश्रा यांना कुंभमेळा, हाथरस प्रकरणात निडरपणे शासन प्रशासनाला सवाल करताना आपण आपण टीव्हीच्या स्क्रिनवर बघितलंय बघितलंय. सोशल मीडियावर देखील त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. मात्र, गेल्या काही दिवसात त्या सोशल मीडियावर दिसत नव्हत्या. त्यानंतर लगेचच सोशल मीडियावर भाजप विरोधात बोलल्यामुळे त्यांची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली (pragya mishra killed) असे दावे व्हायरल होतायेत.
‘प्रज्ञा मिश्रा की दिन दहाडे हत्या कर डी गई, क्योंकी वे कोरोना वायर्स के बीच हो रहे कुंभ प्र बात कर रही थी. वो कुंभ के जोखीम के बारे में बात कर रही थी. बीजेपी सरकार के खिलाफ बोलने वाले एक और Activist कि हत्या.’
अशा कॅप्शनसह व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असलेला फोटो ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अविनाश घोडके यांनी निदर्शनास आणून दिला आणि पडताळणी करण्याची विनंती केली.
पडताळणी:
‘भारत समाचार’ या चॅनलवर ‘कटिंग चाय’ नावाच्या कार्यक्रमातून जगाला जमिनी हकीकत सांगणाऱ्या प्रज्ञा मिश्रा गेल्या काही दिवसांत चांगल्याच चर्चेत आहेत. हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणात रिपोर्टिंग करताना जमिनीवर ठाण मांडून बसलेल्या प्रज्ञा मिश्रा यांना देशाने पाहिलंय. त्यांची हत्या झाल्याचे व्हायरल दावे एका सीसीटीव्ही फुटेज क्लिपसह १८ एप्रिलपासूनच व्हायरल होतायेत.
- प्रज्ञा मिश्रा सुखरूप
पडताळणी करत असताना स्वतः प्रज्ञा मिश्रा यांचे ट्विट आम्हाला सापडले ज्यात त्यांनी आपल्या हत्येचे (pragya mishra killed) व्हायरल दावे खोटे असल्याचे सांगताना आपण कोव्हीड प्रोटोकॉल मुळे घरी असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण एकदम सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देखील दिली आहेत.
- हत्या झालेली युवती कोण?
‘इंडिया टूडे‘च्या बातमीनुसार दिल्लीच्या रोहिणी परिसरात हरीश मेहता या व्यक्तीने त्याच्या पत्नीचा भर रस्त्यात खून केला. नीलू असे त्या युवतीचे नाव असून ती सफरदजंग हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती. ८ महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. २४ वर्षीय हरीश मेहताला दिल्ली पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या कलम ३०२ नुसार खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. पुढील तपास चालू आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावा फेक असल्याचे निष्पन्न झाले असून पत्रकार प्रज्ञा मिश्रा सुखरूप आहेत. व्हायरल व्हिडीओमधील युवती दिल्ली येथील असून आरोपीला अटक झाली आहे.
Be First to Comment