Press "Enter" to skip to content

‘हलाल’ म्हणून मुस्लीम स्वयंपाकी मिसळतात अन्नात थुंकी? उच्च न्यायालयात दिली कबुली?

तमिळनाडू उच्च न्यायालयातील (tamil nadu high court) एका खटल्यात मुस्लिमांनी असे मत मांडले की जोपर्यंत स्वयंपाकी त्यात थुंकत नाही तोपर्यंत हलालचा (Halal) अर्थ पूर्ण होत नाही. अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत.

Advertisement

व्हायरल मेसेज:

तामिळनाडूतील एका न्यायालयीन खटल्यात मुस्लिमांनी असे मत मांडले की जोपर्यंत स्वयंपाकी त्यात थुंकत नाही तोपर्यंत हलालचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे मुस्लिमांनी तयार केलेले अन्न थुंकल्याशिवाय पूर्ण होत नाही. एका न्यायालयीन खटल्यात त्यांनी कबूल केले की थुंकण्याने हलाल पूर्ण होते, TN सह राष्ट्रातून.

  केरळ आणि तामिळनाडूमधील हॉटेल्स आणि बिर्याणी विक्रेत्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. हिंदूंनी हलाल हॉटेल्स आणि बिर्याणी विकणाऱ्यांनीही जाणे बंद केले आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये अनेक रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बेकरी हलाल स्टिकर्स आणि बोर्ड काढून टाकत आहेत.

या आस्थापनांमध्ये हिंदू ग्राहकांची प्रचंड गर्दी झाल्यानंतर हे घडत आहे.कारण थुंकण्याचे असंख्य व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

हलाल प्रक्रियेतून बनवलेल्या बिर्याणीच्या पुढच्या थाळीला हात लावण्यापूर्वी.... लक्षात घ्या, जेवणावर थुंकले तरच ती हलाल आहे! हे कोर्टात सादर केलेल्या सबमिशननुसार आहे म्हणून, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कोणत्याही हलाल हॉटेलमध्ये किंवा बिर्याणी कार्टमध्ये जेवण्यापूर्वी विचार करा, ज्याचा उरलेला भाग तुम्ही खाणार आहात.

 #हलालवर बहिष्कार. अधिकाधिक लोकांना जागरूक करण्यासाठी तुमचा कार्य करा..कोणत्याही मुस्लिम हॉटेलमधून जेवण मागवू नका......
यावर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकते..... पटणार नाही त्यांनी मेसेज डिलिट करावा.....🙏
TN high court Halal food viral message
Source: Whatsapp

व्हॉट्सऍपवर देखील हे मेसेजेस मोठ्या प्रमाणात व्हायरल होताहेत. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रा. नारायण भोसले, कृष्णा चांदगुडे, मोहन शिंदे, प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले, गोविंद भुजबळ, रमेश म्हात्रे, सुनील जैन, ऍड. राजू खरे आणि शैलेश चौधरी या सर्वांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

फेसबुक, ट्विटर या माध्यमांतही हे मेसेज व्हायरल होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.

पडताळणी:

या मेसेजची सत्यता जाणून घेण्याआधी मुस्लीम धर्मानुसार ‘हलाल’ म्हणजे नेमके काय हे समजून घ्यायला हवे.

हलाल म्हणजे काय?

‘इस्लामिक काउन्सिल ऑफ व्हिक्टोरीया’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ‘हलाल’ हा एक अरबी शब्द आहे. याचा अर्थ नियमात बसणारे, योग्य. मुस्लीम धर्मग्रंथ ‘कुराण’नुसार काय योग्य आणि काय अयोग्य याची विशिष्ठ नियमावली आहे.

योग्य बाबींना ‘हलाल’ (Halal)आणि अयोग्य बाबींना ‘हराम’ (Haram)असे म्हणतात. यामध्ये इतर विविध जगण्याच्या पद्धतींप्रमाणे काय खावे आणि काय खाऊ नये याचाही समावेश आहे. लाल मांस असणारे प्राणी कापण्याची विशिष्ठ पद्धत देखील यामध्ये दिलेली आहे. एन्झाईम, जिलेटीन, दारू, डुकराच्या मांस इत्यादी बाबी हराम आहेत.

न्यायालयात मुस्लिमांनी दिली थुंकण्याच्या प्रथेची कबुली?

व्हायरल मेसेजमध्ये ‘ तामिळनाडूतील एका न्यायालयीन खटल्यात मुस्लिमांनी असे मत मांडले की जोपर्यंत स्वयंपाकी त्यात थुंकत नाही तोपर्यंत हलालचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे मुस्लिमांनी तयार केलेले अन्न थुंकल्याशिवाय पूर्ण होत नाही. एका न्यायालयीन खटल्यात त्यांनी कबूल केले की थुंकण्याने हलाल पूर्ण होते.’ असे लिहिलेले आहे.

याविषयी पडताळणी करण्यासाठी आम्ही विविध कीवर्ड्स वापरून सर्च केले. ‘लाइव्ह लॉ’ या केवळ न्यायालयीन घडामोडींवर बातमी देणाऱ्या पोर्टलवरही सर्च केले परंतु अशी कुठलीही बातमी सापडली नाही.

हलाल करिता अन्नात थुंकणे गरजेचे असते असे कोण म्हणाले?

हॉटेलवर ‘प्युअर व्हेज’ असे आपण अनेकदा पाहिले असेल. तसेच मुस्लीमबहुल भागात हॉटेलवर किंवा अन्नाच्या पाकिटांवर ‘हलाल फूड’ असे लिहिलेले असते. याचा अर्थ हे पदार्थ बनवताना ‘कुराण’च्या नियमात बसणाऱ्याच पदार्थांचा वापर केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक एस जे आर कुमार यांनी केरळ उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये असे म्हंटले आहे की शबरीमाला मंदिरात प्रसादासाठी वापरण्यात आलेल्या गुळाच्या पाकिटांवर ‘हलाल’ (Halal) असे लिहिले आहे. तसा गुळ प्रसादासाठी वापरणे भक्तांच्या भावना दुखावणारे आहे.

उच्च न्यायालयाने यात नेमकी अडचण काय असे विचारले असता कुमार म्हणाले “मुस्लीम तत्वेत्त्यांनुसार हलाल अन्न बनविण्यासाठी थुंकी/लाळ महत्वाची असते”. यावर न्यायलयाने तुम्ही अगोदर ‘हलाल’ अन्न म्हणजे नेमके काय हे समजून घेण्याची गरज आहे असे म्हणत त्यांना खडसावले.

केरळ हॉटेलचालकांची मुख्यमंत्र्यांना अर्जी:

केरळ हॉटेलचालकांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना अर्जी केली आहे की सोशल मीडियात खोट्या व्हिडीओजच्या आधारे संपूर्ण हॉटेल चालकांना विशेषतः मुस्लीम हॉटेल चालकांना बदनाम करत आहेत. त्यांच्यावर सायबर कायद्यानुसार कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत पोलीस विभागाला तशा सूचना दिल्या आहेत.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinrayi Vijayan) यांनी या ‘हलाल’ वादास संघ परिवाराची समाजात फुट पाडण्याची नीती असल्याचे म्हंटले आहे. कट्टर हिंदुत्ववादी राजकरणामागे भाजप देशात दुफळी माजवत आहे. लोकशाहीचा घात करत अल्पसंख्याक समाजास मुद्दाम लक्ष्य केले जात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल दावे चुकीचे असून कुठल्याही मुस्लीम संघटनेने किंवा नेत्यांनी तमिळनाडू उच्च न्यायालयात (tamil nadu high court) अन्नात थुंकी टाकल्याशिवाय ‘हलाल’ (Halal) पूर्ण होत नाही असे कधीही सांगितले नाही.

हे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘एस जे आर कुमार’ नामक प्रचारकाने केरळ न्यायालयात बोलले होते, यावर नायालयाने त्यांना खडे बोल सुनावलेले.

मुस्लीम अन्नात थुंकी मिसळतात हे पसरवण्यासाठी आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल केले गेले आहेत, त्यापैकी काहींची पोलखोल ‘चेकपोस्ट मराठी’ने केली आहे. वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा