Press "Enter" to skip to content

कोरोना लसीचे 100 कोटी डोस देणारा भारत जगातील पहिला देश ठरला?

कोरोना (Coronavirus) विरोधातील लढाईत भारताने नुकतेच 100 कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. भारताच्या दृष्टीने कोरोना विरोधातील लढाईतील हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. यानिमित्ताने अनेकांकडून सरकारचे कौतुक देखील केले जातेय.

Advertisement

‘आज तक’च्या अँकर अंजना ओम कश्यप यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट केलंय. ट्विटमध्ये कश्यप यांनी भारत 100 कोटींचे लसीकरण करणारा जगातील पहिला देश ठरला असल्याचा दावा केलाय. कश्यप यांचं ट्विट जवळपास 4000 पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय. 

अर्काइव्ह

‘टाईम्स नाउ नवभारत’ने देखील आपल्या बातमीमध्ये अशाच प्रकारचा दावा केला आहे.

अर्काइव्ह

भारताने केलेले 100 कोटींचे लसीकरण ही लक्षणीय कामगिरी असली तरी भारत अशा प्रकारची कामगिरी करणारा जगातला पहिला देश ठरला असल्याचा दावा पूर्णतः चुकीचा आहे.

महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार चीनने 21 जून 2021 रोजीच 100 कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. चीनला 100 दशलक्ष ते 200 दशलक्ष हा टप्पा गाठण्यासाठी फक्त 25 दिवसांचा कालावधी लागला. तर, पुढील 100 दशलक्ष डोसचे लक्ष्य साध्य करण्यास 16 दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर 800 ते 900 दशलक्ष डोसचे लक्ष्य गाठण्यास फक्त सहा दिवसांचा कालावधी लागला.

Maharashtra Times news about china vaccination record
Source: Maharashtra Times

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या व्हॅक्सिन ट्रॅकरनुसार लसीकरणामध्ये आजघडीला देखील चीनचीच आघाडी कायम असून चीनमध्ये जवळपास 224 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. भारत हा 100 कोटींचे लसीकरण पूर्ण करणारा दुसरा देश ठरला आहे.

John Hopkins stats for china vaccination
Source: https://coronavirus.jhu.edu/

दरम्यान, चीनने लसीकरणात आघाडी घेतली असली तरी कोरोनाचा धोका पूर्णतः टळलेला नाही. कोरोनाने पुन्हा एकदा चीन, रशिया आणि ब्रिटनमध्ये नव्याने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चीनमधील अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ब्रिटन आणि रशियात देखील कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे जगाची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हेही वाचा- जागतिक आरोग्य संघटनेने २०२२ सालच्या सुरुवातीस कोरोना महामारी संपणार असल्याचे जाहीर केले आहे?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या ‘9172011480‘ या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा