Press "Enter" to skip to content

IIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का?

सोशल मीडियावर एक ग्राफ व्हायरल होतोय. IIT कानपुरच्या प्राध्यापकांकडून बनविण्यात आलेल्या या ग्राफच्या आधारे कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) १५ जुलैपासून येणार असल्याची शक्यता IIT कानपुरकडून (IIT kanpur) व्यक्त करण्यात आली असल्याचा दावा केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

 • कोरोना व्हायरसची दुसरी लाट नुकतीच कुठे ओसरलेली असताना आता तिसऱ्या लाटेविषयीच्या (third wave of corona) तर्क-वितर्कांना उधाण आलेले बघायला मिळतेय. अबालवृद्धांपासून ते तज्ञांपर्यंत सगळ्यांमध्येच तिसऱ्या लाटेविषयीच्या वेगवेगळ्या चर्चा आणि वेगवेगळे अंदाज ऐकायला-बघायला मिळताहेत.
 • कोरोनाची तिसरी लाट येणार का? आली तर ती नक्की कधी येणार? याविषयी बराच संभ्रम आहे. काही जणांकडून तर खात्रीशीररित्या तिसरी लाट येणारच नाही, असे दावे देखील केले जाताहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातला (third wave of corona) IIT कानपुरच्या (IIT kanpur) प्राध्यापकांचा एक अभ्यास देखील चर्चेत आहे.
 • IIT कानपुरचे प्राध्यापक राजेश रंजन आणि महेंद्र वर्मा यांच्याकडून दुसऱ्या लाटेतील आकडेवारीचे विश्लेषण करून कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार १५ जुलैपर्यंत देश दुसऱ्या लाटेसंदर्भातील निर्बंधांपासून पूर्णपणे अनलॉक होईल. म्हणजेच जानेवारी सारखी परिस्थिती असेल.
 • १५ जुलैनंतरच्या काळात लोकांचे वर्तन कसे असेल या आधारे तीन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तिसऱ्या लाटेविषयीचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. त्या तीन शक्यता पुढीलप्रमाणे- 

१. पहिल्या शक्यतेनुसार कोणतेही निर्बंध न ठेवता परिस्थिती पूर्वपदावर आल्यास कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात पीक पॉइंटवर असेल. यादरम्यान दररोज साधारण ३.२ लाख केसेस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

२. दुसऱ्या परिस्थितीत विषाणूच्या नव्या आणि अधिक संसर्गजन्य प्रकारामुळे कोरोनाचा प्रसार होईल. अशा परिस्थितीमध्ये कोरोना भयावह रूप धारण करेल. दररोज साधारणतः ५ लाखांपर्यंत नवीन केसेस येऊ शकतील. सप्टेंबरमध्ये ही लाट पीक पॉइंटवर असेल.

३. तिसरी शक्यता अशी वर्तविण्यात आली आहे की सर्व निर्बंध हटविण्यात आल्यानंतर (म्हणजेच १५ जुलैच्या अनलॉकनंतर) जर लोकांनी योग्य ती काळजी घेतली, मास्क वापरला आणि सोशल डिस्टंसिगचे पालन केले तर, अशा परिस्थितीत ही लाट नियंत्रणात असू शकेल. या लाटेचा पीक पॉईंट ऑक्टोबरमध्ये असेल. मात्र दुसऱ्या लाटेच्या तुलनेत केसेस कमी असतील.

 • दरम्यान अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की या अभ्यासामध्ये लसीकरणाचा, लसीकरणानंतरच्या परिणामांचा विचार करण्यात आलेला नाही. म्हणजेच हे सर्व अंदाज कुणाचेही लसीकरण झालेले नाही, या गृहीतकावर अवलंबून आहेत. देशभरातील लसीकरणाची आकडेवारी घेऊन IIT कानपुरकडून नवीन अभ्यास केला जात आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार ही गोष्ट स्पष्ट होते की IIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलेली नाही. १५ जुलै ही संपूर्ण देशाची अनलॉक होण्याची तारीख गृहीत धरून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयीच्या तीन वेगवेगळ्या शक्यता वर्तविण्यात आलेल्या आहेत.

हे ही वाचा- केजरीवाल, राहुल गांधींना सेल्समन म्हणत तिसरी लाट ‘फायजर’ची खेळी सांगणाऱ्या दाव्याची झाडाझडती!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा