Press "Enter" to skip to content

दिलीप कुमार यांनी सर्व संपत्ती मुस्लिम वक्फ बोर्डाला दान केली आहे का?

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी नाना तर्हेचे दावे केले जाताहेत. सोशल मीडियावर अनेकांकडून दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आपली सर्व संपत्ती मुस्लिम वक्फ बोर्डाला (waqf board) दान केल्याचे दावे केले जाताहेत.

Advertisement

रिपब्लिक चॅनेलचे मालक अर्णब गोस्वामी यांच्या पॅरोडी अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट करण्यात आलंय. हे ट्विट १३०० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट केलं गेलंय.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील अनेकांनी अशाच प्रकारचे दावे केले आहेत. यात दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आपली ९८ कोटी रुपयांची संपत्ती वक्फ बोर्डाला (waqf board) दान केल्याचं सांगण्यात आलंय.

Dilip kumar donated property to waqf board FB claims check post marathi
Source: Facebook

दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे दावे करणाऱ्यांचा प्रमुख रोख त्यांच्या मुस्लिम धर्मीय असण्याकडे लोकांचे लक्ष्य वेधण्याचा आहे. सुदर्शन टीव्हीचे प्रमुख सुरेश चव्हाणके यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरून दिलीप कुमार यांच्या मृत्यूची बातमी देणारं जे ट्विट केलंय, त्यावरून हे चटकन लक्षात येतं की ते नेमकं काय सांगू बघताहेत.

अर्काइव्ह

पडताळणी :

  • दिलीप कुमार यांनी आपली संपत्ती वक्फ बोर्डाला दान केल्याविषयीच्या कुठल्याही बातम्या प्रसिद्ध नाहीत. दिलीप कुमार यांचे सोशल मीडिया मॅनेजर फैजल फारुकी यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. 
  • फेक सोशल मीडिया आयडीद्वारे फेक दावे केले जाताहेत. व्हायरल दाव्यांमध्ये कुठलेही तथ्य नसून ते पूर्णपणे खोटे आहेत. दिलीप कुमार यांच्या सर्व संपत्तीची मालकी सध्या त्यांच्या पत्नी सायरा बानो यांच्याकडे असल्याचे देखील फारुकी यांनी स्पष्ट केले आहे.
  • व्हायरल दाव्यात दिलीप कुमार यांनी आपली सर्व ९८ कोटींची संपत्ती वक्फ बोर्डाला दान केली असल्याचे सांगण्यात आले आहे. हा ९८ कोटींचा आकडा देखील काल्पनिक आहे. कदाचित दिलीप कुमार यांच्या वयावरून तो घेण्यात आला असावा. ‘पत्रिका’च्या रिपोर्टनुसार दिलीप कुमार आपल्यामागे ६२७ कोटींची संपत्ती सोडून गेले आहेत.
  • महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनीस शेख यांनी देखील वक्फ बोर्डाला दिलीप कुमार यांच्याकडून कुठलेही दान मिळाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वक्फ बोर्डाला संपत्ती दान करण्यात नक्की अडचण काय?

वक्फ बोर्ड ही मुस्लिम धर्मियांची धार्मिक संस्था नसून ती भारत सरकारच्या अधिपत्याखालील अल्पसंख्यांक मंत्रालयाची संस्था आहे. वक्फ बोर्डाची स्थापना १९६४ साली करण्यात आली होती.

Source: Central Waqf Council
  • ‘वक्फ बोर्ड’ सरकारी संस्था असून प्रत्येक राज्यात एक वक्फ बोर्ड असते. संबंधित राज्यातील सरकारकडून वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली जाते. वक्फ बोर्डाला दिले जाणारे दान पूर्णतः कायदेशीर आहे.
  • दिलीप कुमार यांनी वक्फ बोर्डाला संपत्ती दान केल्याचे दावे फेक असल्याचे स्पष्ट झालेले आहेच. पण समजा व्हायरल दावे खरे असते तरी वक्फ बोर्डाला दान देण्यात नक्की अडचण काय असाही प्रश्न उरतोच.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील दिलीप कुमार यांनी आपली सर्व संपत्ती वक्फ बोर्डाला दान केल्याचे दावे निराधार आणि काल्पनिक आहेत. वक्फ बोर्डाकडून ही बाब नाकारण्यात आली आहे.

हेही वाचा- दिलीप कुमार यांच्या शेवटच्या क्षणांचा म्हणून आठ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा