Press "Enter" to skip to content

तंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल? व्हायरल बातम्या चुकीच्या!

‘तंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित? CSIRच्या अहवालातून (csir report on smoking) मोठा खुलासा’ अशा हेडलाईनसह News18 लोकमतची बातमी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Source: Dailyhunt

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अमरदीप पवार आणि गोविंद भुजबळ यांनी सदर बातमीची लिंक व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

Advertisement

पडताळणी:

 • भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या CSIR म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेने तंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा खुलासा करणारा अहवाल (csir report on smoking) सादर केल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या सर्व बातम्या PTI या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने देण्यात आल्या होत्या.
 • यातच त्यांनी हे स्पष्ट केले की भारतीय नागरिकांमध्ये Covid19 चा प्रादुर्भाव होण्याची कारणे शोधणारा जो सर्व्हे करण्यात आला त्यामध्ये काही बाबींचे अंदाज बांधण्यात आले. त्या अहवालात ‘तंतुमय पदार्थ खाल्ल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असण्याची शक्यता आहे. तसेच धुम्रपान करणाऱ्यांचा आणि कोरोना होणार्यांचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट होत नाही. यासंबंधी सखोल संशोधनाची गरज आहे’ अशा प्रकारची वाक्यरचना होती.
 • परंतु बातम्यांनी या अहवालातील वाक्यांचा अर्थ समजून न घेता थेटच ‘शाकाहारी लोकांना आणि धुम्रपान करणाऱ्यांना कोरोना होण्याची शक्यता कमी’ असल्याचे जाहीर करून टाकले.
 • याविषयी केंद्र शासनाच्या PIBने देखील या दाव्यांना ‘फेक’ म्हंटले आहे.
 • त्याच चुकीच्या बातम्यांचा आणि काही (सिद्ध न झालेल्या) आंतरराष्ट्रीय संशोधनांचा आधार घेत तंबाखूजन्य पदार्थांचे व्यापारी आणि विक्रेत्यांनी मुंबई उच्चन्यायालयात याचिका दाखल केलीय. ‘CSIR च्या अहवालानुसार तंबाखू कोरोना विषाणूच्या लढाईत रामबाण ठरत असेल, तर देशात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणली जाऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की CSIRने तंबाखू सेवनाने किंवा धूम्रपानाने कोरोनापासून सुरक्षित राहता येत असल्याचा दावा कधीच केला नव्हता. त्यामुळे त्या संबंधीच्या बातम्या ‘फेक’ आहेत.

व्यापाऱ्यांच्या याचिकेसंबंधी बातमी देत असताना ‘News18 लोकमत’ने CSIRचे किंवा PIBचे स्पष्टीकरण न पाहता

‘धूम्रपान किंवा तंबाखू खाणाऱ्या लोकांना कोरोनापासून धोका नसल्याचा खुलासा CSIR ने अर्थातच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं केला आहे. तंबाखूजन्य पदार्थातील निकोटीन नावाचा पदार्थ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचा खुलासा CSIR च्या एका अहवालात करण्यात आला आहे.’

अशा निराधार आणि फेक वाक्यांच्या आधारे वाचकांची दिशाभूल केलीय.

हेही वाचा: ‘स्मोकर्स लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका’ WHOने सांगितली स्पष्ट कारणे

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा